आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीझर रिलीज:भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने विवेक ओबरॉयने शेअर केला 'वर्सेस ऑफ वॉर' सिनेमाचा टीझर

एका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'वर्सेस ऑफ वॉर' या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसाद कदम यांनी केले आहे.

भारतीय सैन्य दिनाचे औचित्य साधत बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने त्याच्या आगामी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. 'वर्सेस ऑफ वॉर' असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिले आहे,"सैन्य दिनानिमित्त भारतीय सैन्याला काव्यात्मक श्रद्धांजली. सादर करीत आहे, 'वर्सेस ऑफ वॉर'चा टीझर".

भारतीय सैनिकाची भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉय आणि पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा रोहित रॉय 15 वर्षांनंतर एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 2007 मध्ये संजय गुप्ता यांच्या 'शूटआउट अॅट लोखंडवाला' या सिनेमात दोघे एकत्र दिसले होते.

'वर्सेस ऑफ वॉर' या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसाद कदम यांनी केले आहे. तसेच FNP मीडिया, विकास गुटगुटिया, गिरीश जोहर निर्मित आणि प्रस्तुत, विवेक आनंद ओबेरॉय आणि ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट सह-निर्मिती केली आहे.

सिनेमाविषयी विवेक म्हणाला,"आपल्या शांततेच्या एका श्वासासाठी प्राणांची आहुती देणार्‍या असंख्य वीरांना आपण कधीही विसरू नये".

तसेच विवकने मकर संक्रांतीनिमित्त मुलांसोबत पतंग उडवतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले आहे, मकर संक्रांतीत मला पतंग उडवायला आवडतात. ही परंपरा आता माझ्या मुलांपर्यंत पोहोचवत आहे.

बातम्या आणखी आहेत...