आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्रीचा कायापालट:लेटेस्ट फोटोजमध्ये दिसले स्मृती इराणींचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, वजन कमी करुन झाल्या फॅट टू फिट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनीष पॉल स्मृती यांची भेट घ्यायला त्यांच्या घरी पोहोचला होता.

केंद्रीय मंत्री आणि माजी टीव्ही अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या नवीन फोटोत एक जबरदस्त बदल पाहायला मिळाला आहे. आज समोर आलेल्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये स्मृती खूपच स्लिम आणि फिट दिसत आहेत. टीव्ही अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलने स्मृती यांच्यासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मनीष पॉल स्मृती यांची भेट घ्यायला त्यांच्या घरी पोहोचला होता. तिथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वागत केले. मनीषने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये स्मृती यांचा लूक खूप बदललेला दिसत आहे. स्मृती यांच्या आधीच्या फोटोंवर नजर टाकल्यास त्यामध्ये त्या खूप लठ्ठ दिसतात, पण आज मनीषने शेअर केलेल्या फोटोत त्यांचे बरेच वजन कमी झालेले दिसत आहे. स्मृती यांनी गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनवर लक्ष केंद्रित केले असल्याचे यावरुन दिसून येतंय.

मनीषने फोटोसह कॅप्शन लिहिले - 'मला एक कप काढा पाजल्याबद्दल स्मृती मॅडम धन्यवाद. काय वेळ आली आहे? चहाऐवजी सगळ्यांनी काढा पिण्यास सुरुवात केली आहे, परंतु मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. मास्क फक्त छायाचित्रासाठी काढला आहे,' अशा आशयाचे कॅप्शन मनीषने दिले आहे.

मनीषची ही पोस्ट समोर आल्यानंतर यूझर्सचेही स्मृती यांच्या फिट लूकने लक्ष वेधून घेतले आहे.

वयाच्या 24 व्या वर्षी केले होते टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण
45 वर्षीय स्मृती सोशल मीडिया अकाऊंटवर थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. 2000 मध्ये 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेतून त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. त्यावेळी त्या 24 वर्षांच्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...