आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. परिणीतीच्या साखरपुड्याला हजेरी लावण्यासाठी तिची चुलत बहीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा लंडनहून दिल्लीला पोहोचली आहे. प्रियांकाचा दिल्ली विमानतळावरील व्हिडिओ देखील समोर आला आहे. याचदरम्यान सेल्फीसाठी दोन तरुणांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना दिल्ली विमानतळावर घडली.
सेल्फीसाठी चाहत्यांनी केले हैराण
व्हिडिओमध्ये प्रियांका ब्राउन ओवरसाइज्ड आउटफिटमध्ये दिसतेय. तिने ब्लॅक कॅपदेखील घातली आहे. प्रियांका तिच्या सुरक्षा पथकासह विमानतळाबाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान, काही चाहते सेल्फी घेण्यासाठी प्रियांकाच्या मागे धावताना दिसले. यावेळी काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने प्रियंकासोबत सेल्फी घेण्यासाठी तिच्या सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली.यामुळे प्रियांका नाराज दिसली.
प्रियांकाने चाहत्यासह घेतला सेल्फी
विमानतळावरील प्रियांकाच्या टीमच्या सदस्यांनीही त्या व्यक्तीला धक्काबुक्की केली. यानंतर अभिनेत्री तिथे थांबली आणि चाहत्याला नाराज न करता तिने त्या व्यक्तीसोबत सेल्फी घेतला. पण याचवेळी बाजूने डेनिम शर्ट घातलेली दुसरी व्यक्ती तिच्या अगदी जवळ आली, हे पाहून प्रियांका अन्कम्फर्टेबल झाली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्राच्या आईने परिणीतीला दिल्या शुभेच्छा
प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी पिंकविलाशी संवाद साधताना परिणीतीला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राघव-परिणीतीच्या नात्याबद्दल त्या खूप खूश असल्याचे त्यांनी सांगितले आणि दोघांनाही त्यांनी आशीर्वाद दिले.
13 मे रोजी ग्रँड एंगेजमेंट सोहळा
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा आज म्हणजेच 13 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीत मोठ्या थाटामाटात साखरपुडा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सोहळा दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. हा सोहळा पूर्णपणे खासगी ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राजकारण आणि चित्रपट क्षेत्रातील सुमारे 150 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. कुटुंब आणि जवळच्या मित्रांव्यतिरिक्त, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.