आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचे अलीकडेच किडनी निकामी झाल्यामुळे निधन झाले. परंतु नावातील साम्यामुळे सोशल मीडियावर बर्याच लोकांनी तिच्याऐवजी अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मिष्टी चक्रवर्ती हिने आप जिवंत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
मिष्टी चक्रवर्तीने रविवारी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'काही माध्यमांच्या वृत्तानुसार माझे आज निधन झाले. पण देवाच्या कृपेने, मी निरोगी आहे आणि अजून मला खूप पुढे जायचे आहे. # चुकीची बातमी.' या पोस्टसह तिने फेक न्यूजचा एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये गुगलवर मिष्टी मुखर्जी डेथ सर्च केल्यावर तिच्या निधनाची माहिती समोर येतेय.
सुभाष घई यांच्या 'कांची' चित्रपटाद्वारे केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण
दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'कांची' चित्रपटाद्वारे मिष्टी चक्रवर्ती हिने 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर, ती 'ग्रेट ग्रँड मस्ती' (2016), 'बेगमजान' (2017) आणि 'मणिकर्णिका' (2019) या चित्रपटांमध्ये झळकली.
View this post on InstagramA post shared by Mishti Chakravarty (@mishtichakravarty) on Oct 3, 2020 at 2:05pm PDT
शुक्रवारी रात्री झाले मिष्टी मुखर्जीचे निधन
हिंदी आणि बंगली चित्रपटांमध्ये काम केलेल्या मिष्टी मुखर्जीचे 2 ऑक्टोबरच्या रात्री दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, कीटो डाएट घेतल्यामुळे तिची तब्येत ढासळली होती. ती अवघ्या 27 वर्षांची होती. निधनानंतर शनिवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कीटो डाएट घेतल्यामुळे प्रकृती ढासळली होती
मिष्टीच्या निकटवर्तीयाने आपल्या निवेदनात म्हटले की, 'ब-याच चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये आपली कला दाखविणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जी आता आपल्यात नाही. कीटो डायटमुळे तिचे मूत्रपिंड निकामी झाले आणि बंगळूरु येथे शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. तिला अखेरच्या क्षणी खूप वेदना झाल्या. तिची पोकळी भरून न निघणारी आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो. तिच्या मागे आईवडील आणि भाऊ आहेत. '
जूही चावलाच्या चित्रपटात झळकली होती
मिष्टीने 2012 मध्ये 'लाइफ की तो लग गई' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर, 2013 मध्ये मैं कृष्णा हूं या चित्रपटातील एका गाण्यात ती रजनीश दुग्गलसोबत दिसली होती. या चित्रपटात जूही चावला मुख्य भूमिकेत होती. तर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा स्पेशल अपिअरन्स होता. याशिवाय मिष्टी काही आयटम नंबरमध्येही दिसली. हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.