आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबच्या हरनाज संधूने वयाच्या 21 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. 'मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021' हा किताब पटकावल्यापासून तिने मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकण्यासाठी कठोर परिश्रम सुरू केले. हरनाज हे मॉडेलिंग आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला.
लोक म्हणायचे खायला मिळत नाही का
हरनाजने किशोरवयात बॉडी शेमिंग आणि बुलिंग सामना केला आहे. शाळेत असताना ती फार बारीक होती. तिच्या कमी वजनामुळे तिची अनेक वेळा चेष्टा व्हायची. यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने यावर मात केली. आणि आरोग्याची काळजी घेतली.
आई स्त्रीरोगतज्ज्ञ, वडील व्यापारी
हरनाजचे कुटुंब चंदीगडजवळील मोहालीतील खरारमधील मून पॅराडाईज सोसायटीत वास्तव्याला आहे. तिच्या वडिलांचे नाव परमजीत संधू आणि आईचे नाव रविंदर कौर संधू आहे. भावाचे नाव हरनूर आहे. तिची आई चंदीगड येथील सेक्टर-16 येथील सरकारी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. हरनाजला देशाची राजकीय व्यवस्था आवडली, तिला या क्षेत्रात काम करायचे आहे आणि म्हणूनच ती सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेत आहे.
हरनाज कौरला व्हायचे आहे न्यायाधीश
हरनाजच्या आईने सांगितल्यानुसार, त्यांच्या मुलीला न्यायाधीश बनायचे आहे. हरनाज हिचे चंदीगडच्या सेक्टर 41 स्थित शिवालिक पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. सेक्टर-35 खालसा स्कूलमधून तिने 12 वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. हरनाज ही सेक्टर-42 स्थित पोस्ट ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेज (GCG) ची विद्यार्थिनी आहे. रंगभूमीची आवड असलेल्या हरनाज कौर हिलाप्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. शांत स्वभावाच्या हरनाजने शाळेपासून कॉलेजपर्यंत कधीही कोचिंग घेतले नाही.
नावाची घोषणा होताच तरळले अश्रू
हरनाजच्या विजयाचा एक व्हिडिओ मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओत भारताची सौंदर्यवती हरनाज संधू आणि पॅराग्वेची सौंदर्यवती नदिया फरेरा या दोघी एकमेकांचा हात धरुन उभ्या असल्याचे दिसत आहे. त्यावेळी हरनाजच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या मनात सुरु असलेली धडधडही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. यावेळी AND The New Miss Universe is….INDIA. असे जाहीर होते.
योग आणि ध्यानाद्वारे नैराश्यावर विजय मिळवला
बॉडी शेमिंग आणि बुलिंगमुळे हरनाजच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला होता. तिला वाटले की कदाचित तिच्यात कमतरता आहे. त्या काळात हरनाजच्या आईने तिला खूप साथ दिली. आई आणि कुटुंबीयांनी तिला पटवून दिले की, तू इतरांपेक्षा वेगळी आहेस आणि तुला स्वतःला स्वीकारावे लागेल आणि आत्मविश्वास वाढवावा लागेल. यानंतर, हरनाजने स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले आणि योग ध्यानाद्वारे तिने स्वतःमध्ये बदल घडवला.
पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री
2018 मध्ये मिस इंडिया पंजाबचा किताब जिंकल्यानंतर हरनाजने द लँडर्स म्युझिक व्हिडिओ 'तरथल्ली' मध्ये काम केले. हरनाजने तिच्या अभ्यास आणि स्पर्धांची तयारी करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने 'यारा दियां पौ बारां' आणि 'बाई जी कुट्टांगे' सारख्या चित्रपटात काम केले आहे.
2017 मध्ये दिला होता पहिला स्टेज परफॉर्मन्स
हरनाजने 2017 मध्ये कॉलेजमध्ये एका शोमध्ये पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतर तिचा हा प्रवास सुरू झाला. तिला घोडेस्वारी, पोहणे, अभिनय, नृत्य आणि प्रवासाची खूप आवड आहे. मोकळ्या वेळेत ती स्वतःचे हे छंद पूर्ण करते. ती फूडी आहे पण सोबतच फिटनेसचीही काळजी घेते. तिले आवडणारे सर्व पदार्थ ती खाते. सर्वकाही खा पण व्यायामाला विसरु नका, असे ती सांगते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.