आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मिस युनिव्हर्स 2022' या सौंदर्य स्पर्धतील फायनलिस्ट मॉडेल सीएना वीरचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सीएनाने अखेरचा श्वास घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करताना तिला मोठा अपघात झाला होता. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
2 एप्रिल रोजी झाला अपघात
वृत्तानुसार, 2 एप्रिल रोजी सिएना ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो मैदानात घोडेस्वारी करत होती. पण अचानक ती घोड्यावरुन खाली पडली. त्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही आठवड्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. तिला व्हेंटिलटेरवर ठेवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.
मिस युनिव्हर्स स्पर्धेतील फायनलिस्ट
'मिस युनिव्हर्स 2022' या स्पर्धेत 27 फायनलिस्टपैकी सिएना एक होती. सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचे शिक्षण घेतले होते. पुढीत शिक्षणासाठी ती युकेला जाणार होती.
सिएनाच्या मृत्यूनंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलिअन फोटोग्राफर क्रिस ड्वायरने शोक व्यक्त करत लिहिले, "जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती... अल्पावधीतच यश मिळवले पण आता सर्वत्र अंधार आहे."
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू केली होती घोडेस्वारी
सिएनाला घोडेस्वारीची खूप आवड होती. गोल्ड कोस्ट मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, 'माझा जास्तीत जास्त वेळ शहरात गेला आहे. माझे शो जंपिगवर जीवापाड प्रेम आहे. माझ्यात ही आवड कशी निर्माण झाली, हे माझ्या कुटुंबीयांनादेखील ठाऊक नाही. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून घोडेस्वारीला सुरुवात केली. त्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनादेखील करू शकत नाही.'
सिएना एक मॉडेल होती. मॉडेलिंग क्षेत्रात तिने उत्तम कामगिरी केली. आपल्या सौंदर्याने तिने चाहत्यांना भूरळ पाडली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉडेल्समध्ये सिएनाची गणना होते. खूप लांबचा पल्ला गाठण्याची सिएनाची इच्छा होती. या प्रवासाला तिने सुरुवातदेखील केली होती. पण अतिशय कमी वयातच तिचा हा प्रवास थांबला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.