आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपुतचे वडील वडील के.के. सिंह यांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच रिया आपल्या कुटुंबासह घरातून गायब झाल्याचे समोर आले होते. सध्या मुंबईत या प्रकरणाचा तपास करणा-या बिहार पोलिसांनाही रिया भेटली नाही. या प्रकरणात आता ईडीने उडी घेतली असून त्यांनी रिया जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले आहे. हिंदूस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, समन्स मिळताच रिया चक्रवर्ती घरी परतली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचे धारेदोरे आर्थिक बाबींशी जोडले असल्याचा संशय ईडीला आहे. याप्रकरणी 7 ऑगस्टला ईडी रियाचा जबाब नोंदवू शकते.
यावर्षी जानेवारी महिन्यात सुशांत 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान कारने चंदीगडला आपल्या बहिणीकडे गेला होता. या पाच दिवसांत रियाने त्याला 25 फोन केले होते, असे समोर आले आहे. तर 8 जून रोजी रिया सुशांतचे घर सोडून आपल्या घरी निघून गेली होती. यादरम्यान तिने सुशांतचा मोबाइल नंबर ब्लॉक केला होता. 8 ते 14 जून या काळात दोघांचे फोनवर बोलणे न झाल्याचेही समोर आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नवीन नंबरवरुन बहिणीला मदत मागण्यासाठी फोन केला होता. सुशांतने म्हटले होते की, रिया आणि तिचे कुटुंबीय त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला रुग्णालयात जाण्याची इच्छा नाही.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप आहेत. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रियाचा सुशांतच्या पैशांवर डोळा होता आणि तिने त्याच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला, असे सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सीबीआय या प्रकरणात चौकशी सुरू करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.