आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • 'Mission Impossible 7 Director Kistofer Answers, Ranveer Singh Is Making His TV Debut, 'Simba' And 'Singham' Will Be Seen In 'Suryavanshi' For Half An Hour

बॉलिवूड ब्रीफ:‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास झळकणार का? दिग्दर्शक किस्टोफर यांनी दिले उत्तर, रणवीर सिंह करतोय टीव्हीवर डेब्यू, ‘सूर्यवंशी’मध्ये अर्धा तास दिसणार ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

‘बाहुबली’ फेम प्रभास हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजसोबत ‘मिशन इम्पॉसिबल 7’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक किस्टोफर मॅक्वेरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘राधे श्याम’चे इटली येथे चित्रीकरण करत आहे. दरम्यान प्रभासने दिग्दर्शक किस्टोफर मॅक्वेरी यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात होते. एका चाहत्याने सोशल मीडियावर क्रिस्टोफर यांना प्रश्न विचारला की, भारतात सोशल मीडियावर मिशन इम्पॉसिबल 7 या चित्रपटात प्रभास दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खरंच प्रभास चित्रपटात दिसणार आहे की नाही? यावर प्रतिक्रिया द्या. चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत क्रिस्टोफर यांनी म्हटले की, ‘प्रभास हा अतिशय गुणी अभिनेता आहे. पण आम्ही भेटलो नाही. इंटरनेटवर तुमचे स्वागत आहे.’ क्रिस्टोफर यांच्या या उत्तरानंतर प्रभास मिशन इम्पॉसिबल 7मध्ये दिसणार नसल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले ाहे.

2. रणवीर सिंह करतोय टीव्हीवर डेब्यू, केबीसी सारखा क्विझ शो करणार होस्ट

अभिनेता रणवीर सिंह लवकरच टीव्हीवर पदार्पण करत आहे. तो एक क्विझ रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार असल्याचे म्हटले जात आहे. या शोचा फॉर्मेट अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीसारखा असेल. बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये हाच दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीरला काही दिवसांपूर्वीच या टीव्ही शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे. तर दुसरीकडेच ‘रामायण’ बरोबरच आणखी एक प्रोजेक्ट ‘सीता’ बनत आहे. तो केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिला आहे. या चित्रपटाची कथा माता सीताच्या दृष्टीकोणातून दाखवली जाणार आहे. हा मोठ्या प्रमाणात बनवला जाणार आहे. यात रावणाची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंहसोबत दिग्दर्शक अलाैकिक देसाई यांनी संपर्क केला आहे. आतापर्यंत या चित्रपटासाठी करीना कपूर आणि आलिया भट यांची नावे समोर आली आहेत. असे झाले तर यात रणवीर आणि करीना एकत्र काम करु शकतात. यापूर्वी ते ‘राम लीला’ करणार होते, मात्र तोपर्यंत दीपिकाला सिनेमासाठी फायनल करण्यात आले हाेते.

3. ‘सूर्यवंशी’मध्ये अर्धा तास दिसणार ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’

अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’मध्ये आपल्या आयकॉनिक अॅक्शन रूपात परत येणार आहे. या कॉप चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहही ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ अवतारात दिसणार आहेत. त्यात अजय-रणवीर काही मिनिटासाठी दिसतील असे आधी ठरले होते. मात्र आता यात दोघेही किमान 30 मिनिटे दिसणार आहेत. हा एक मोठा क्लायमॅक्स सीन आहे ज्यात दोघे अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.

4. प्रभासच्या ‘सालार’मध्ये खलनायक साकारणार जॉन अब्राहम​​​​​​​​​​​​​​

प्रभासच्या अभिनयाने सजलेल्या सालार हा यावर्षीचा सर्वाधिक बहुचर्चित चित्रपट आहे. चित्रपटाचे पहिले वेळापत्रक पूर्ण झाले आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे दुसरे वेळापत्रक पुढे ढकलले गेले. आता या चित्रपटाशी संबंधित मनोरंजक माहिती समोर आली आहे. सूत्रानुसार, दिग्दर्शक प्रशांत नीलने जॉन अब्राहमकडे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी संपर्क साधला आहे. मात्र, त्याने होकार कळवला की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सिनेमात श्रुती हासन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित करण्याचा विचार सुरू आहे.

5. ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करणार दिशा

अल्लू अर्जुनचा मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूत्रानुसार, दिशा पाटणी या चित्रपटात अल्लूबरोबर काम करणार आहे. मात्र ती या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री नसून एका आयटम साँगमध्ये डान्स करताना दिसणार आहे. त्याची अधिकृत माहिती अजून बाकी आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट दोन भागात बनवला जात असल्याचे दिग्दर्शक सुकुमार म्हणाले.

6. सध्या आगामी सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करतेय यामी

यामी गौतम सध्या चंदीगडमधील तिच्या घरी कुटुंबातील सदस्यांसह चांगला वेळ घालवत आहे. यासोबतच ती आपल्या पुढील चित्रपटांची पटकथेलाही वेळ देत आहे. सूत्रानुसार, सध्या आपण घरी आहोत आणि स्क्रिप्ट वाचण्याची हीच योग्य असल्याचे यामीला वाटते. शिवाय वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमाचा शोध घेण्याची ही सर्वात योग्य वेळ असल्याचे ती म्हणते. नुकतेच यामीने तिच्या ‘भूत पोलिस’चे शूटिंग पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...