आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिथून दांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही:70 वर्षीय मिथून चक्रवर्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त व्हायरल,  मुलगा मिमोह म्हणाला -  माझे वडील अगदी ठीक आहेत

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे नेते सौगता रॉय यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

मिथुन चक्रवर्ती कोविड पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्ताचे त्यांचा मुलगा मिमोहने खंडन केले आहे. तो म्हणाला, "डॅडी एकदम ठीक आहेत. ते एका शोवर काम करत आहेत. सोबतच पश्चिम बंगालमधील लोकांसाठीही ते काम करत आहेत. देवाची कृपा आणि त्याच्या चाहत्यांच्या प्रेम व आशीर्वादामुळे ते ठीक आहेत.ते मला दररोज कठोर परिश्रम आणि सकारात्मक राहण्यासाठी प्रेरणा देतात." एका एंटरटेन्मेंट वेबसाइटने सोशल मीडियावर दावा केला होता की, मिथुन दांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ते होम क्वारंटाइनमध्ये आहेत. मात्र आता ते बरे असल्याचे त्यांच्या मुलाने स्पष्ट केले आहे.

70 वर्षीय मिथुन यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये हिंदीव्यतिरिक्त बंगाली, उडिया, भोजपुरी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वीच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा लागला होता आरोप

दोन दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोविड नियमांचे उल्लघंन केल्याचा आरोप झाला होता. तृणमूल काँग्रेसचे नेते सौगता रॉय यांनी दावा केला होता की, भाजप नेते दिलीप घोष आणि मिथुन चक्रवर्ती कोविड नियमांचा भंग करत 500 हून अधिक लोकांना एकत्र करुन मिटिंग्स घेत आहेत. या प्रकरणात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.

दोन महिन्यांपूर्वीच भाजपात झाला प्रवेश
मिथुन चक्रवर्ती यांनी दोन महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या सभेदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते.

नक्षली ते सिनेमापर्यंतचा प्रवास
खुप कमी लोकांना माहिती असेल की, मिथुन चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापुर्वी कट्टर नक्षली होते. एका अपघातात त्यांच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथुन दांनी स्वतःला नक्षली आंदोलनापासून दूर केले. त्यांनी कोलकाताच्या प्रसिध्द स्कॉटिश चर्च कॉलेजमधून केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. आतापर्यंत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांत काम केले आणि आजही ते बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी 'मृगया' (1976) या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते 'मेरा रक्षक' (1978), 'सुरक्षा' (1979), 'तराना' (1979), 'हम पांच' (1980), 'डिस्को डांसर' (1982), 'प्यार झुकता नहीं' (1985), 'गुलामी' (1985), 'अग्निपथ' (1990), 'वीर' (2010), 'गोलमाल -3' (2010), 'किक' (2014) सह अनेक चित्रपटांमध्ये झळकले.

तीनदा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
मिथुन चक्रवर्ती यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि एकदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'मृगया' (1976) या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि दुस-यांदा 'तहादरर कथा' (1996) साठी त्यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली. 'स्वामी विवेकानंद' (1998) चित्रटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...