आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मिथुन चक्रवर्ती यांना बंगळुरुच्या रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, मुतखड्याच्या समस्येने होते त्रस्त

लेखक: अमित कर्ण24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पप्पा पूर्णपणे ठीक आहेत: मिमोह

बॉलिवूडचे डिस्को डान्सर अर्थातच मिथुन चक्रवर्ती अलीकडेच मुतखड्याच्या समस्येने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना बंगळुरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मिथुन दा यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने दिव्य मराठीला ही माहिती दिली आहे.

पप्पा पूर्णपणे ठीक आहेत: मिमोह
मिमोने दिव्य मराठीला सांगितले की, पप्पा आता ठीक आहेत. किडनी स्टोनमुळे आम्ही त्यांना बंगळुरूमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर किडनी स्टोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून आता ते पूर्णपणे बरा होऊन घरी परतले आहेत.

माजी खासदारांनी शेअर केला फोटो
भाजपचे माजी खासदार डॉ. अनुपम हाजरा यांनी मिथुन चक्रवर्ती यांचा हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला फोटो ट्विट केला आहे. त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये मिथुन दा यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेट वेल सून मिथुन दा, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...