आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Mithun Chakraborty Birthday: Chemistry Graduate But Had Become A Naxalite, Gave 33 Consecutive Flops Even Then Got 13 Films, Played Double Role In 17 Films

हॅपी बर्थडे मिथुन चक्रवर्ती:केमिस्ट्री ग्रॅज्युएट पण बनले होते नक्षलवादी, 17 चित्रपटांत साकारला डबल रोल, सलग 33 चित्रपट झाले होते फ्लॉप

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भावाच्या निधनानंतर घेतला होता नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडण्याचा निर्णय

बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती आज 72 वर्षांचे झाले आहेत. मिथुन यांनी 1976 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'मृगया' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी डिस्को डान्सर, गुडिया, कस्तुरी यांसारखे जवळपास 350 उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास 17 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे हा हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंतचा एक विक्रम आहे. भारताबद्दल सांगायचे झाले तर हा विक्रम मल्याळम अभिनेते प्रेम नजीर यांच्या नावावर आहे, ज्यांनी 40 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त मिथुन यांच्याकडे भरपूर मालमत्ता आहे. म्हैसूर, मसिनागुडी यांसारख्या देशातील अनेक सुंदर ठिकाणी त्यांचे बंगले, हॉटेल्स, कॉटेज आणि आलिशान घरे आहेत.

बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट डान्सरचा दर्जा मिळवलेल्या मिथुन दा यांनी आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जीव ओतला. असे म्हणतात की मिथुन चक्रवर्ती आपल्या चित्रपटांमध्ये पहिल्या टेकमध्येच परफेक्ट शॉट्स देत असत. पण एक काळ असा होता जेव्हा ते कॅमे-यासमोर नव्हे तर स्टार्सच्या मागे फिरायचे. होय, मिथून चक्रवर्ती लोकप्रिय अभिनेत्री हेलन यांचे असिस्टंट होते. आणि येथूनच त्यांना चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला. आज मिथुन दांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, जाणून घेऊया त्यांचा चित्रपट प्रवास कसा सुरु झाला...

भावाच्या निधनानंतर घेतला होता नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडण्याचा निर्णय
16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथून चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. ओरियंटल सेमिनारमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमधून केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. खुप कमी लोकांना माहिती असेल की, मिथुन चित्रपट चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कट्टर नक्षली होते. नक्षली बनल्याने ते कुटुंबापासून वेगळे झाले होते. मात्र एका अपघातात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिथून यांनी नक्षलवादी चळवळींमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि ते आपल्या कुटुंबामध्ये परत आले. नक्षलवादाशी संबंध तोडल्यामुळे मिथुन यांच्या जीवालाही धोका होता, पण असे असूनही ते घाबरले नाहीत. चळवळीत सहभागी असताना कुख्यात नक्षलवादी रवी रंजनशी त्यांची मैत्री घट्ट होती.

स्टार्सच्या मागे फिरता फिरता बनले बॉलिवूडचे डिस्को डान्सर
घरी परतल्यानंतर त्यांची चित्रपटांमध्ये रुची निर्माण झाली. चित्रपटात येण्यासाठी मिथुन यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेतून अभिनयाचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. बर्‍याच संघर्षानंतर मिथून यांना हेलन यांच्या असिस्टंटची नोकरी मिळाली होती. एका जुन्या मुलाखतीत मिथून दांनी सांगितले होते की, एक काळ असा होता, जेव्हा त्यांना एक वेळचे जेवणही मिळत नसायचे. मात्र ही वाईट वेळ फार काळ टिकली नाही. सहायक म्हणून काम करत असताना त्यांना अमिताभ बच्चन यांच्या ‘दो अनजाने’ या चित्रपटात काही मिनिटांचा रोल मिळाला होता. त्यांनी याकाळात बॉडी डबल म्हणूनही चित्रपटांमध्ये काम केले.

मिथुन मृणाल सेनच्या 'मृगया' या चित्रपटात झळकलेय. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1978 मध्ये 'रक्षक' आणि 1979 च्या 'सुरक्षा' या चित्रपटांमुळे मिथुन स्टारडमवर पोहोचले.

मिथुन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील एक सुवर्ण काळ आला जेव्हा त्यांना 1982 चा 'डिस्को डान्सर' चित्रपट मिळाला. 100 कोटींची कमाई करणारा हा हिंदी चित्रपटातील पहिला चित्रपट होता. पण चित्रपटाचा व्यवसाय भारतापेक्षा सोव्हिएत युनियनकडून जास्त होता. मिथुन हे नॉन डान्सर होते, पण जेव्हा त्यांनी चित्रपटाच्या गरजेनुसार डान्स केला तेव्हा त्यांच्या स्टेप्स देशभर प्रसिद्ध झाल्या.

एका वर्षात 19 चित्रपटांत झळकून बनवला रेकॉर्ड
यानंतर त्यांनी कसम पैदा करने वाले की, डिस्को-डिस्को (1982), कमांडो (1988), प्यार झुकता नहीं (1985), गुलामी (1985), मुझे इंसाफ चाहिए (1983), घर एक मंदिर (1984), स्वर्ग से सुंदर (1986) आणि प्यार का मंदिर (1988) या चित्रपटांतील उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 1989 मध्ये मिथुन दांचे एकाच वेळी 19 चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात इलाका, मुजरिम, प्रेम प्रतिज्ञा, लडाई, गुरू आणि बीस साल या चित्रपटांचा समावेश आहे.

सलग 33 चित्रपट झाले होते फ्लॉप
1993 ते 1998 या काळात मिथुन यांचे जवळपास 33 चित्रपट सतत फ्लॉप झाले होते, मात्र त्यानंतर दिग्दर्शकांच्या विश्वासामुळे त्यांना आणखी 12 चित्रपट मिळाले.

पहिले लग्न 4 महिन्यांत मोडले

मिथुन चक्रवर्ती यांनी हेलन ल्यूकशी 1979 मध्ये लग्न केले होते. पण हे लग्न फक्त 4 महिने टिकले. मिथुन यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोडल्यानंतर योगिता बालीशी लग्न केले. त्यांना मिमोह, नमाशी, उशमेह ही तीन मुले आहेत. मिथुन यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या एका मुलीलाही दत्तक घेतले आहे, त्यांनी तिचे नाव दिशानी ठेवले आहे.

विवाहित असतानाच श्रीदेवीशी केले होते लग्न

रिपोर्ट्सनुसार, 1984 साली रिलीज झालेल्या 'जाग उठा इंसान' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर मिथून आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याचीही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. मिथून आणि श्रीदेवी यांचे लग्न तीन वर्षे टिकले. 1988 मध्ये दोघे वेगळे झाले होते. एका मॅगझिनने मिथून आणि श्रीदेवी यांचे मॅरेज सर्टिफिकेट प्रकाशित केल्यानंतर मिथून दांनी लग्नाची कबुली दिली होती. श्रीदेवी यांना मिथून विवाहित असल्याची कल्पना होती. पण मिथून चक्रवर्तींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या श्रीदेवी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

मिथून यांची बायको योगिता बालीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांनाही मिथून-श्रीदेवीच्या लग्नाची माहिती होती. एका न्यूजपेपरने दोघांच्या लग्नाचे सर्टिफिकेट छापले होते. परंतू दोघांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. यामागे मिथून यांची बायको योगिता या होत्या. योगिता यांनी मिथून यांना धमकी दिली होती की, श्रीदेवीसोबत संबंध ठेवले तर त्या आत्महत्या करतील. मिथून यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. मिथून यांच्यासोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर श्रीदेवी यांनी 1996 मध्ये निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते.

लक्झरी लाइफ आणि कुत्र्यांची आवड

मिथुन चक्रवर्ती यांच्या घरात जवळपास 38 कुत्रे आहेत, तर त्यांच्या उटी येथील घरात 78 कुत्रे वाढले आहेत. उटीतील सर्वात प्रसिद्ध हॉटेलपैकी एक असलेले मोनार्क हॉटेल मिथुन चक्रवर्ती यांचे आहे. त्याच वेळी, मसीनागुडीमध्ये त्यांचे 16 बंगले आणि कॉटेज आहेत. त्यांच्याकडे म्हैसूरमध्ये 18 कॉटेज आणि अनेक रेस्तराँ आहेत. चित्रपट आणि व्यवसायाव्यतिरिक्त मिथुन 2014 पासून राजकारणातही सक्रिय आहेत.

तीनदा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
मिथून यांना 'मृगया' या पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1993 मध्ये 'ताहादार कथा' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'स्वामी विवेकानंद' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते

बातम्या आणखी आहेत...