आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्को डान्सरच्या आयुष्याशी संबधित गोष्टी:विवाहित असूनही मिथून चक्रवर्तींनी श्रीदेवीसोबत केले होते गुपचुप लग्न, वाईट काळात फ्लॉप झाले होते 33 चित्रपट

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते कामावर परतणार आहेत.

बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सच्या नावाने प्रसिध्द असलेले 70 वर्षीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली आहे. मसूरी येथे द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या सेटवर ते कोसळले होते. फूड पॉइजिनिंगमुळे त्यांना त्रास झाल्याचे सांगितले जाते. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते कामावर परतणार आहेत.

16 जून, 1950 ला कोलकातामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. हे नाव त्यांनी कधीच चित्रपटांसाठी वापरले नाही. त्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मिथून दांच्या आयुष्यावर एक नजर टाकुयात...

नक्षली ते सिनेमापर्यंतचा प्रवास
खुप कमी लोकांना माहिती असेल की, मिथुन चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यापुर्वी कट्टर नक्षली होते. कौटूंबिक अडचणींमुळे त्यांनी आपला रस्ता बदलला आणि आपल्या कुटूंबामध्ये परत आले. एका अपघातात त्यांच्या एकुलत्या भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथुन यांनी स्वतःला नक्षली आंदोलनापासून दूर केले. त्यांनी चित्रपट करिअरची सुरुवात 1976 मध्ये आलेल्या 'मृगया' चित्रपटातून केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

विवाहित असूनही श्रीदेवीसोबत केले होते दुसरे लग्न
मिथुन यांचे नाव त्यांच्या को-स्टार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि इतर अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतू त्यांच्या श्रीदेवीसोबतच्या अफेअरची चर्चा सर्वात जास्त रंगली. 1984 मध्ये 'जाग उठा इंसान' मध्ये श्रीदेवी आणि मिथुन यांनी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. मिथुन चक्रवर्तीने एका मुलाखतीत स्वतः कबूल केले होते की, त्यांनी श्रीदेवीसोबत गुपचुप लग्न केले होते.

रिपोर्ट्सनुसार, 1984 साली रिलीज झालेल्या 'जाग उठा इंसान' या सिनेमाच्या शूटिंग सेटवर मिथुन आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याचीही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. इतकेच नाही तर एका मॅगझिनने मिथून आणि श्रीदेवी यांचे मॅरेज सर्टिफिकेट प्रकाशित केल्यानंतर मिथून दांनी लग्नाची कबुली दिली होती. श्रीदेवी यांना मिथून विवाहित असल्याची कल्पना होती. पण मिथून चक्रवर्तींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या श्रीदेवी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

मिथुन यांची बायको योगिता बालीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांनाही मिथुन-श्रीदेवीच्या लग्नाची माहिती होती. एका न्यूजपेपरने दोघांच्या लग्नाचे सर्टिफिकेट छापले होते. परंतू दोघांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. यामागे मिथुन यांची बायको योगिता या होत्या. योगिता यांनी मिथुन यांना धमकी दिली होती की, श्रीदेवीसोबत संबंध ठेवले तर त्या आत्महत्या करतील. मिथुन यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.

अभिनेता असल्यासोबतच मिथुन 'मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स'चे मालकही आहेत. त्यांचे तामिळनाडुच्या ऊटी, मसिनागुडी आणि कर्नाटकच्या मैसूर येथे अनेक हॉटेल्स आहेत. मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ऑफिशिअल वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार, उटीमधील हॉटेल्समध्ये 59 रुम्स, 4 लग्जरी सुईट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाइट काउ ब्वॉय बार, डिस्को सोबत किड्स कॉर्नर यांसारख्या सुविधाही आहेत.

मसिनागुडी येथील हॉटेलमध्ये 16 एसी बंगले, 14 ट्विन्स मचांस, 4 स्टैंडर्ड रूम, मल्टीकुशीन रेस्तरॉ आणि चिल्ड्रेन प्ले ग्राउंड सोबत हॉर्स राइडिंग आणि जीप जंगल राइड यांसारख्या सुविधा आहेत.

मसुरी येथील हॉटेलमध्ये 18 वेल फर्निश्ड एसी कॉटेज, 2 एसी सुइट्स, ओपन एयर मल्टीकुशीन रेस्तरॉसोबत स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रेवल रिलेटेड सर्विसेस आहेत.

350 चित्रपटांमध्ये केले काम
मिथुन बॉलिवूडमधील अशा व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांना कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नव्हते. इंडस्ट्रीमध्ये त्यांचे कोणतेही गॉड फादर नाही. त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली. कोलकाताच्या प्रसिध्द स्कॉटिश चर्च कॉलेजमधून मिथुन यांनी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्यूएशन केले. चित्रपटात येण्यासाठी त्यांना पुणे फिल्म संस्थानमधून अॅक्टिंगचा कोर्स केला. आतापर्यंत त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे आणि आताही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी 'वारदात', 'अविनाश', 'जाल', 'डिस्को डांसर', 'भ्रष्टाचार', 'घर एक मंदिर', 'वतन के रखवाले', 'हमसे बढ़कर कौन', 'चरणों की सौगंध', 'हमसे है जमाना', 'बॉक्सर', 'बाजी', 'कसम पैदा करने वाले की', 'प्यार झुकता नहीं', 'करिश्मा कुदरत का', 'स्वर्ग से सुंदर' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

1993 ते 1998 हा त्यांचा सर्वात वाईट काळ होता. तेव्हा त्यांचे चित्रपट एकामागोमाग फ्लॉप होत होते. या काळात त्यांचे लागोपाठ 33 चित्रपट फ्लॉप ठरले होते. तरीही त्यांचे स्टारडम टिकून होते. त्यावेळी त्यांना 12 चित्रपट साइन केले होते.

बातम्या आणखी आहेत...