आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेहिसाब'च्या शूटिंगसाठी भोपाळमध्ये पोहोचले मिथून चक्रवर्ती:ढाब्यावर जेवणाचा सीन केला शूट, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

सलामतपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी निर्माते मध्य प्रदेशाला पसंती देताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या आगमी बेहिसाब या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भोपाळमध्ये पोहोचले होते. भोपाळ-विदिशा राज्य महामार्गावरील देहरी गावात असलेल्या ढाब्यावर अलीकडेच सकाळी 9 वाजल्यापासून बेहिसाब चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. सकाळपासून अनेक व्हॅनिटी बस आणि फिल्म युनिटमधील 150 लोक याठिकाणी उपस्थित होते. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. देवरी गावात मिथून दा कुर्ता पायजामा घालून ढाब्यावर जेवण करताना दिसले.

मिथून दांची एक झलक बघण्यासाठी तोबा गर्दी
यादरम्यान ढाब्याच्या बाहेर ट्रॉलीमध्ये गोणी भरून ठेवण्यात आली होती. त्यांचा लूक बघता ते या चित्रपटात शेतकऱ्याची भूमिका साकारत असल्याचे दिसून आले. त्यांचे बरेचसे सीन या ढाब्यावर शूट झाले. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या संख्येने शूटिंग स्थळी दाखल झाले होते.

मात्र, अभिनेत्याच्या आजूबाजूला कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती आणि कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. शूटिंगच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान दुरुनच चाहत्यांना मिथून दांची झलक बघायला मिळाली.

दोन महिने चालणार शूटिंग
भोपाळच्या आसपासच्या गावांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग जवळपास दोन महिने चालणार आहे. जबलपूरच्या भेडाघाट, सातपुढा, पचमडी, ग्वालियर, ओरछा आणि इंदोर या ठिकाणी चित्रीकरण होणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असल्याचे वृत्त आहे.

काही काळापूर्वी, ज्युनियर बच्चन अभिषेकने KD या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे येथे शूटिंग केले होते. सलामतपूर रेल्वे स्टेशनवर हे चित्रीकरण झाले होते. अभिषेक बच्चनला चित्रपटाचा फक्त एक शॉट देण्यासाठी दहा तास लागले होते.

बातम्या आणखी आहेत...