आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपट दिग्दर्शक बी सुभाष यांच्या पत्नी तिलोत्तिम्मा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. तिलोत्तिम्मा गेल्या सहा वर्षांपासून किडनी आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. बी सुभाष त्यांच्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत. एकेकाळी प्रसिद्धीझोतात असेलेल बी सुभाष काही काळानंतर मात्र विस्मृतीत गेले.
पत्नीच्या उपचारांसाठी पैसे नव्हते
सुभाष यांच्या पत्नीवर गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही काळापूर्वी ते आर्थिक संकटाचा सामना करत असून पत्नीच्या उपचारांसाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याची बातमी आली होती.
सहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीला किडनीचा गंभीर आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतर सुभाष यांनी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र चाचण्यांनंतर तिलोत्तिम्मा यांना फुफ्फुसांचा आजार असल्याचे निष्पन्न झाले होते. फुफ्फुसांवर परिणाम होऊ नये, म्हणून डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती.
सलमान खानने केली होती मदत
बी सुभाष हे दोन मुली आणि मुलांचे वडील आहेत. त्यांनी 18 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कोरोनाच्या काळात सुभाष यांची आर्थिक परस्थिती खूप बिकट झाली होती. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या उपचारांसाठी बॉलिवूडमधील लोकांना आवाहन केले होते, त्यानंतर सलमान खान आणि मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांना मदत केली होती.
1982 मध्ये मिळाली ओळख
बी सुभाष यांचे पूर्ण नाव बब्बर सुभाष आहे. 1978 मध्ये आलेल्या 'अपना खून' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. यानंतर सुभाष यांनी जालिम, तकदीर का बादशाह, कसम पैदा करने वाले की, अॅडव्हेंचर ऑफ टार्झन, कमांडो, लव्ह लव्ह लव्ह या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण बब्बर सुभाष यांना 1982 मध्ये आलेल्या 'डिस्को डान्सर' या चित्रपटातून ओळख मिळाली, ज्यात मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.