आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आणि पत्नी वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणुक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मिथुन यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही धमकावल्याचा आरोप आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम करणार्या अभिनेत्री-मॉडेलने दोघांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
लेखी तक्रारीत पीडित मॉडेलचा काय आहे आरोप?
या कलमांतर्गत गुन्हा दाखल
ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितल्यानुसार, महाक्षय आणि त्याच्या आईविरूद्ध कलम 376 (2) (N) (वारंवार त्याच महिलेवर बलात्कार करणे), 328 (विष देणे किंवा दुस-या पद्धतीने हानी पोहोचवणे), 417 (फसवणूक), 506 (धमकावणे), 313 (स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात करणे) आणि कलम 34 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही एफआयआर दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने दिलेल्या एका आदेशानंतर मुंबईत दाखल करण्यात आली. पीडितेने 2018 मध्ये कोर्टात धाव घेतली होती. सुरुवातीला कोर्टाने दिल्लीत तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. मात्र अंतिम निर्णयानंतर हे प्रकरण मुंबईत ट्रान्सफर केले गेले. या प्रकरणी ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आता पोलिस पुढील तपास करत आहेत.
महाअक्षयवर यापूर्वीही लागले होते असे आरोप
महाअक्षय यापूर्वीही अशाच अडचणीत सापडला होता. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये एका भोजपुरी अभिनेत्रीने महाअक्षयावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.