आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथुन चक्रवर्ती सेटवर कोसळले:'द काश्मीर फाइल्स'च्या शूटिंग दरम्यान मिथुन चक्रवर्तींची प्रकृती बिघडली, निर्मात्यांना चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिथून चक्रवर्ती यांना फूड पॉइझनिंग झाल्याचे समजते.

मिथुन चक्रवर्ती सध्या मसूरीमध्ये दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या आगामी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले होते. मात्र शनिवारी आऊटडोअर शूटिंग सुरु असताना मिथून चक्रवर्ती अचानक सेटवर कोसळले. त्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लगेच चित्रपटाचे शूटिंग थांबवले.

विवेक यांनी घटनेची माहिती दिली
विवेक अग्निहोत्री यांनी मिड-डेला सांगितल्यानुसार, “चित्रपटातील साहसदृश्याचे शूटिंग सुरू होते आणि मिथुन सरांच्या भूमिकेला विशेष महत्त्व होते. मात्र फूड पॉइझनिंगमुळे त्यांना उभंसुद्धा राहता येत नव्हते. थोडा वेळ ब्रेक घेऊन त्यांनी त्यांचे शूटिंग पूर्ण केले. त्यांना आराम करण्याची खूप विनंती केली पण चाळीस वर्षांहून अधिक करिअरमध्ये कधीच कोणत्या चित्रपटाच्या सेटवर आजारी पडलो नसल्याचे त्यांनी मला सांगितले. काहीही झाले तरी शूटिंग थांबले नाही पाहिजे यावर ते ठाम होते”, असे विवेक अग्निहोत्री म्हणाले.

चित्रपटात अनुपम, पुनीत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका

'द काश्मीर फाइल्स' विषयी बोलायचे म्हणजे या चित्रपटात 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवरील अत्याचार, हत्याकांडाची कहाणी दाखवण्यात येईल. मिथुन चक्रवर्ती व्यतिरिक्त अनुपम खेर आणि पुनीत इस्सर यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. वृत्तानुसार, किसान आंदोलनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. त्यांच्या जागी आता पुनीत इस्सर चित्रपटात झळकणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...