आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजय देवगण आणि नीरज पांडे यांनी त्यांच्या पुढील चित्रपटासाठी ऑस्कर विजेते संगीतकार एमएम किरावानी यांच्यासोबत काम केले आहे. अजय देवगण म्हणाला, 'किरवानी यांच्या संगीताचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.'
शेषनागाच्या आकृतीच्या सिंहासनावर बसतात किरवानी - ललित पंडीत
मुकेश भट्ट यांनी सर्वप्रथम एमएम किरवानी यांना बॉलिवूडमध्ये आणले होते. 90 च्या दशकातील नागार्जुन आणि मनीषा कोईराला यांचा 'क्रिमिनल' हा चित्रपट होता. त्यातील गाणी गीतकार इंदिवर यांची होती. प्रसिद्ध संगीतकार ललित पंडित यांनी एमएम किरावानी यांना मदत केली होती.
ललित पंडित म्हणाले, 'खरं तर किरवानी साहेबांना तेव्हा भाषेची अडचण होती. अशा परिस्थितीत मुकेश भट्ट साहेबांनी मला इंदिवर यांना मदत करण्यास सांगितले. मला इंदिवर यांच्याकडून गाणी लिहून घ्यायला सांगितले. त्यानंतर मी आणि कुमार सानू दक्षिणेतील किरवानी यांच्या ऑफिसमध्ये गेलो. यानंतर किरवानी यांनी 'तू मिले दिल खिले' हे गाणे रचले, ज्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.'
ललित पंडित पुढे म्हणाले, 'किरवानी हे अतिशय धार्मिक व्यक्ती आहेत. त्यांच्या ऑफिसमधील म्युझिक रुममध्ये आम्हाला शेषनागाच्या आकाराचे सिंहासन दिसले. वर शेषनागाच्या फनाची रचना आहे. किरवानी त्यावर बसून वाद्याच्या सहाय्याने संगीत तयार करतात. ते कपाळावर अबीर लावतात. त्यांच्या संगीताने भारताचा मान वाढला याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यांचे नाव किरवानीचा अर्थ संगीतातील राग होतो. त्यांच्या नसानसात संगीत आहे.'
किरवानी यांना हा सन्मान खूप आधीच मिळायला हवा होता
निर्माते मुकेश भट्ट म्हणाले, 'किरवानी यांना हा सन्मान खूप आधीच मिळायला हवा होता. त्यांच्या रचना ओरिजिनल असतात. त्यांच्या संगीतात भेसळ नाही.'
'ते गाणी कॉपी करत नाहीत. 'क्रिमिनल' चित्रपटातील गाण्यांना त्यांनी दिलेले संगीत आजही अजरामर आहे. तसेच त्यांनी 'जख्म' चित्रपटासाठी दिलेले 'गली में आज चांद निकला' हे गाणेही अजरामर आहे. आज त्यांना जो मान मिळतोय, तो त्यांना खूप आधीच मिळायला हवा होता,' असे भट्ट म्हणाले.
दोन तासांत 15 ते 16 चाली तयार करतात
मुकेश भट्ट म्हणाले, 'त्यांच्या 10 हजारांहून अधिक रचना असतील. संगीत दुनियेतील ते एक मोठे नाव आहे. सोबतच ते एक अतिशय व्यावहारिक आहेत. कमी बजेटच्या चित्रपटातही ते संगीत देतात.'
'दोन तास ते तुम्हाला 15 ते 16 चाली ऐकवतील. त्यांना संगीत देण्यासाठी 10 ते 15 दिवसही लागत नाहीत. ते आमच्यासाठी दक्षिणेतून मुंबईत आले होते. आमच्या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले,' असे मुकेश भट्ट यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.