आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता-दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत. आता ग्लॅडरॅग्सची माजी मॉडेल नम्रता शर्मा सिंह हिने साजिद खानवर विनयभंगाचा आरोप केला आहे. 2011 मध्ये साजिद खानने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा करत मॉडेलने साजिद खानवर निशाणा साधला आहे. याआधीही मी-टू अंतर्गत सुमारे 10 अभिनेत्री आणि मॉडेल्सनी साजिदविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
मॉडेलने साजिदवर लावले गंभीर आरोप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नम्रतासोबत घडलेली ही 2011 ची आहे. तेव्हा ती एका चित्रपटाच्या ऑडिशनच्या निमित्ताने साजिद खानला भेटायला गेली होती. नम्रताने मीडियाला सांगितल्यानुसार, 'मी शॉर्ट ड्रेस घातला होता आणि रूममध्ये प्रवेश करताच साजिदने दरवाजा बंद केला. खरं तर आम्ही चित्रपटाच्या फीबद्दल बोलत होतो. मला वाटले की, मानधनाबद्दल कोणीही आमचे बोलणे ऐकू नये म्हणून त्याने दरवाजा बंद केला असावा. पण साजिदने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला,' असे मॉडेलने सांगितले.
नम्रताने 12 वर्षांनंतर सोडले मौन
नम्रता म्हणाली- 'मी ओरडून त्याला ढकलले. इंडस्ट्रीतील लोकांनी मला सांगितले की, साजिद खानच्या चित्रपटात काम मिळवण्यासाठी अनेकवेळा साजिदसोबत झोपावे लागते. त्या घटनेनंतर मी कधीही त्याच्याकडे गेले नाही किंवा फोन केला नाही. मी ही घटना विसरले होते. पण अलीकडील बिग बॉसच्या वादामुळे मी 12 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दल बोलायचे ठरवले आहे,' असे नम्रताने स्पष्ट केले.
कोण आहे नम्रता शर्मा सिंह?
नम्रता ही माजी ग्लॅडरॅग्स पेजेंट आहे. 2007 ते 2009 पर्यंत ती यशस्वी रॅम्प मॉडेल होती. याशिवाय नम्रताने अनेक ब्रँडसाठी फोटोशूटही केले आहे. साजिदच्या विरोधात आरोप करणा-या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.