आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरण:मॉडेल झोया राठोडचे राज आणि उमेश यांच्यावर धक्कादायक आरोप, म्हणाली - त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर न्यूड ऑडिशनचे व्हिडिओ पाठवायला सांगितले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हाट्सअ‍ॅपवर न्यूड ऑडिशनचे व्हिडिओ पाठवायला सांगितले गेले

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अटकेनंतर पोर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता मॉडेल झोया राठोडने पॉर्न रॅकेटबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. झोयाने सांगितल्यानुसार, तिला राज कुंद्राकडून अश्लील चित्रपटाची ऑफर मिळाली होती. इतकेच नाही तर हॉटशॉट्स अ‍ॅपवर काम करण्यासाठी उमेश कामतने तिला बर्‍याच वेळा फोन केला होता.

व्हाट्सअ‍ॅपवर न्यूड ऑडिशनचे व्हिडिओ पाठवायला सांगितले गेले
झोया म्हणाली की, 'फेब्रुवारी महिन्यात उमेशच्या अटकेपूर्वी त्याने तिचा अ‍ॅडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी होकार मिळवला होता. उमेशने झोयाला ऑफिसमध्ये न बोलावता व्हॉट्सअ‍ॅपवर न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले होते. मात्र, झोयाने यासाठी नकार दिल्यानंतरही उमेशने तिला कॉल करणे सुरुच ठेवले होते. उमेश कामतने तिला अ‍ॅडल्ट चित्रपटांसाठी दररोज 20 हजार रुपये ऑफर केले होते.'

70 हजारांची ऑफर देण्यात आली होती
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झोयाने सांगितले, 'उमेशला अटक होण्यापूर्वी त्याचे कॉल येत होते. हॉटशॉट्स अ‍ॅपवर काम करणा-या रॉय नावाच्या व्यक्तीनेही तिला यासंदर्भात फोन केला होता. रॉयने सांगितले होते की, तो यूकेमध्ये राहतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉटशॉट्ससाठी न्यूड वेब सीरिज बनवत आहे.' झोयाने सांगितल्यानुसार, रॉयने तिला त्याच्यासोबत काम केल्यास दररोज 70,000 रुपये देणार असल्याचे म्हटले होते.

यश ठाकूरचा राज कुंद्राशी संबंध असल्याचे माहित नव्हते
झोया राठोडने यापूर्वी बडे अच्छे लगते है, सौभाग्यवती भव आणि फियर फाइल्स सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. झोयाने यश ठाकूरबरोबर न्युफ्लिक्स अ‍ॅपच्या एका बोल्ड शोमध्ये देखील काम केले आहे. 2020 मध्ये यश ठाकूर सोबत 'मलिकाना हक'मध्येही तिने भूमिका साकारली होती. ठाकूरचा राज कुंद्राशी संबंध आहे याची आपल्याला कल्पना नव्हती, असा दावा झोयाने केला.

बातम्या आणखी आहेत...