आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कुठे आहे 'मोहब्बतें' गर्ल?:22 वर्षांत इतका बदलला आहे प्रीती झांगियानीचा लूक, 'मोहब्बतें'मधून ड्रीम डेब्यू केल्यानंतरही मिळाले नाही यश

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रीती 42 वर्षांची आहे.

2000 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट 'मोहब्बतें'मध्ये झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानी तुम्हाला आठवत असेल. अलीकडेच प्रीतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात तिचा लूक एकदम वेगळा दिसत आहे. हे फोटो स्वतः प्रीतीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात प्रीती विना मेकअप दिसत आहे आणि तिच्या हातात गुलाबांचा गुच्छ आहे. प्रीती 42 वर्षांची आहे.

18 ऑगस्ट 1980 रोजी मुंबईतील एका सिंधी कुटुंबात जन्मलेली प्रीती पहिल्यांदा राजश्री प्रॉडक्शनच्या 'ये है प्रेम' या म्युझिक अल्बममध्ये अभिनेता अब्बाससोबत दिसली. तिचे 'छूई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुडी जच गई' ही गाणी खूप गाजली. यानंतर प्रीती निरमा साबण आणि इतर काही जाहिरातींमध्येही दिसली.

'मोहब्बतें'मधून मिळाला मोठा ब्रेक
प्रीतीने 1999 मध्ये 'मजहविल्ला' नावाच्या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच वर्षी प्रीतीला 'थम्मुदू' या तेलुगू चित्रपटातही ब्रेक मिळाला. दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये अभिनय केल्यानंतर प्रीतीला तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'मोहब्बतें' मिळाला. या चित्रपटानंतर प्रीतीच्या करिअरला वेग येईल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. ' 'ना तुम जानो ना हम', 'चांद के पार चलो', 'वाह! तेरा क्या कहना', 'बाज: ए बर्ड इन डेंजर', 'एलओसी कारगिल' 'आन: मेन एट वर्क','विक्टोरिया नंबर 203','देखो ये है मुंबई रियल लाइफ' या चित्रपटांमध्ये प्रीती झळकली, पण हे सगळे चित्रपट सुपरफ्लॉप झाले.

2008 मध्ये मॉडेलशी लग्न केले
बॉलिवूडमधील फ्लॉप करिअर पाहता प्रीतीने 23 मार्च 2008 रोजी मॉडेल आणि अभिनेता प्रवीण डबाससोबत लग्न केले. 11 एप्रिल 2011 रोजी प्रीतीने जयवीर या मुलाला जन्म दिला. 27 सप्टेंबर 2016 रोजी तिच्या दुस-या मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव देव आहे. 42 वर्षीय प्रीती सध्या मुंबईतील वांद्रे येथे कुटुंबासह राहते आणि मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त आहे.

प्रीतीला करायचे आहे कमबॅक

लग्नानंतर प्रीतीने चित्रपटात काम करणे बंद केले. 2020 मध्ये आलेल्या 'द पुष्कर लॉज' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. प्रीतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 2022 मध्ये ती अधिकाधिक प्रोजेक्ट्सवर काम करेल कारण चाहते तिला कमबॅक कधी करणार असा प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहेत. प्रीतीने संकेत दिले होते की ती कदाचित ओटीटी चित्रपट किंवा सीरिजद्वारे पुनरागमन करेल.

बातम्या आणखी आहेत...