आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत. अझरुद्दीन आपल्या वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नौरीन आहे. त्या मुळच्या हैदराबादच्या आहेत. 1994 मध्ये विवाहित अझहरुद्दीन बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीच्या प्रेमात पडले होते.
90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान संगीता आणि अझर यांची भेट झाली होती. पुढे त्यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1996 मध्ये लग्न केले.
संगीतासाठी पहिल्या पत्नी सोडले
संगीतासोबच लग्न करण्यासाठी अझर यांनी त्यांची पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. त्यावेळी अझर यांना पोटगी म्हणून पहिल्या पत्नीला 1 कोटी रुपये द्यावे लागले होते. त्यावेळी हा देशातील सर्वात महागडा घटस्फोट म्हणून गणला गेला होता. अझरपासून घटस्फोट घेतल्यानंतर नौरीनने कॅनडामधील व्यावसायिकाशी लग्न केले. अझर-संगीता यांचे 14 वर्षांचे संबंध 2010 मध्ये संपुष्टात आले. या दोघांनीही कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अझरुद्दीन यांची मुले
पहिली पत्नी नौरीनपासून अझर यांना दोन मुले झाली. अयाज आणि असाद ही त्यांचे नावे. मात्र सप्टेंबर 2011 मध्ये एका अपघातात त्यांच्या लहान मुलाचे निधन झाले. त्यांचा मुलगा अयाजला बाईक रेसिंगची आवड होती. हैदराबाद एक्सप्रेस वेवर त्याची दुचाकी कोसळली आणि त्यातच त्याचे निधन झाले. तर अझर यांचा दुसरा मुलगा असद क्रिकेटमध्ये करियर बनवत आहे. संगीता-अझर यांची मुलं नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.