आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची भेट:RSS प्रमुख मोहन भागवत यांनी घेतली मिथून चक्रवर्तींची भेट, मिथून म्हणाले - आमचे आधीपासूनच आध्यात्मिक नाते आहे

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्वाची मानली जाते.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची त्यांच्या जुहू निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सकाळी नऊ वाजताच्या सुमारात मोहन भागवत मिथून यांच्या घरी पोहोचले होते. एक तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. सरसंघचालकांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. तर ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती मिथून चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्वाची मानली जाते.

सरसंघचालकांचे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे : मिथून

सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट कौटुंबिक भेट असल्याचे मिथून चक्रवर्ती यांनी सांगितले. खूप दिवसापासून आम्हाला भेटायचे होतं. पण आमच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नव्हती, असे चक्रवर्तींनी सांगितलं. मोहन भागवत यांनी आज घरी येऊन नाश्ता केला. नागपूरला त्यांनी मला सहकुटुंब बोलवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढे मिथून चक्रवर्ती म्हणाले, आमचे आध्यात्मिक नाते आहे. मोहन भागवत जी माझ्या घरी आले, याचा अर्थ असा की ते माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

2019 मध्येही झाली होती भेट
मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांची ही पहिलीच भेट नाही. ऑक्टोबर 2019 मध्येही दोघांची भेट झाली होती. नागपुरातील संघ कार्यालयात मिथून चक्रवर्तींनी सरसंघचालकांची भेट घेतली होती.

मिथून यापूर्वी सरसंघचालकांना भेटण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूरला गेले होते.
मिथून यापूर्वी सरसंघचालकांना भेटण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये नागपूरला गेले होते.

मिथून यांना भाजप तिकिट देऊ शकते
राजकीय तज्ज्ञांच्या मते, अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची पश्चिम बंगालमध्ये लोकप्रियता आहे. याचा फायदा भाजप घेवून त्यांना आपले उमेदवार बनवू शकेल. किंवा ते भाजपचे स्टार प्रचारकही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिथून हे टीएमसीचे खासदार होते
मिथून चक्रवर्ती हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार होते. मात्र वारंवार गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.