आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता मोहित चड्डाचा आगामी 'फ्लाइट' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात थ्रिलर, अॅक्शन आणि सस्पेन्सचा जबरदस्त तडका असल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येते.
चित्रपटात मोहित चड्ढाने रणवीर मल्होत्रा हे पात्र साकारले आहे. रणवीर मल्होत्रा फ्लाइटने प्रवास करण्यासाठी रवाना होतो, मात्र प्रवासादरम्यान त्याचे प्लेन क्रॅश होते. अशावेळी तो प्लेनमध्ये एकटाच अडकतो. तो या भयावह घटनेचा एकमेव साक्षीदार असतो. या विमान दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले जातात. मात्र ही फ्लाइट मुळ मार्गावरुन गेलीच नाही, असे समोर येते. आता रणवीर मल्होत्रा स्वतःला कसा वाचवतो, हे चित्रपटात बघणे रंजक ठरणार आहे. 'आज मरने का मूड नहीं है..'हा संवाद ट्रेलरच्या शेवटी ऐकू येतो.
हा चित्रपट 19 मार्च 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. मोहित चड्ढा व्यतिरिक्त पवन मल्होत्रा, झाकीर हुसैन, शिबानी बेदी आणि प्रीतम सिंह या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
रोहित चड्ढा आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.