आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नुकतेच काही नवीन खुलासे झाले आहेत. यामध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांची नावे समोर आली आहेत. यानंतर ईडीने या अभिनेत्रींची चौकशी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौकशीदरम्यान भूमीने सांगितले की, तिने सुकेश किंवा त्याच्या सहका-यांकडून कोणत्याही प्रकारचे गिफ्ट घेतलेले नाही.
सुकेशने भूमीला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा केला होता प्रयत्न
सुकेशच्या या जाळ्यात भूमी पेडणेकरही अडकली होती. सुकेशची सहकारी पिंकी इराणीने जानेवारी 2021 मध्ये भूमीशी संपर्क साधला होता. पिंकीने भूमीला तिची ओळख वृत्तसंस्थेची एचआर म्हणून करून दिली होती. पिंकीने भूमीला सांगितले होते की, तिच्या कंपनीचे ग्रुप चेअरमन सुकेश चंद्रशेखर हे तिचे मोठे चाहते आहेत. आणि त्याला तिच्याशी खूप मोठ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे आहे. यासोबतच पिंकीने असेही सांगितले की, सुकेशला तिला एक कार गिफ्ट करायची आहे. काही दिवसांनंतर सुकेशने स्वतः भूमीशी संपर्क साधला आणि स्वतःचे नाव शेखर असल्याचे सांगितले. भूमीसोबत त्याला एका प्रोजेक्टवर चर्चा करायची असून तिला एक कार गिफ्ट करायची आहे, असे त्याने सांगितले होते.
भूमीने चौकशीदरम्यान ईडीला सांगितले की, तिला सुकेशकडून कोणतीही भेट मिळालेली नाही. यासोबतच मी त्याची सहकारी पिंकी इराणी हिच्याकडूनही गिफ्ट घेतलेले नाही.
200 कोटींच्या वसुलीचे आहे हे प्रकरण
हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) सुकेश आणि इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि सुमारे 200 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. छापेमारीनंतर ईडीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, "सुकेश चंद्रशेखर हा या फसवणुकीचा मास्टरमाईंड आहे. तो वयाच्या 17 व्या वर्षापासून गुन्हेगारी जगताचा एक भाग आहे. ईडीने 24 ऑगस्ट रोजी चेन्नईतील सुकेशचा सी-फेसिंग बंगला सीज केला होता. त्याच्या बंगल्यातून 82.5 लाखांची रोकड, 2 किलो सोने आणि डझनहून अधिक आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जॅकलिनचा जबाबही नोंदवला होता. .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.