आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग प्रकरण:EDच्या चौकशीत जॅकलिन फर्नांडिसचा खुलासा; म्हणाली- मी आणि सुकेश रिलेशनमध्ये होतो, कॉनमॅन म्हणाला- अभिनेत्रीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर?

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता अलीकडेच ईडीच्या चौकशीत जॅकलिनने खुलासा केला आहे की, सुकेशसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. त्याचबरोबर तिने सांगितले की, सुकेशने तिला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते.

आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो: जॅकलिन
ईडीच्या रिपोर्टनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान सांगितले की, मी सुकेशकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू घेतल्या होत्या. कारण आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. सुकेशने मला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या रिंगमध्ये J आणि S बनवले होतेले. सुकेशने जॅकलिनला एस्पुएला नावाचा घोडा, गुच्चीच्या 3 डिझायनर बॅग, गुच्चीच्या 2 जिम वेअर, लुई विटॉचे एक जोडी शूज, 2 जोडी डायमंड कानातले आणि एक रुबी ब्रेसलेट, दोन हेमीज ब्रेसलेट आणि एक मिनी कूपर कारचा समावेश आहे.

रिलेशनशिपमध्ये होता म्हणून दिल्या भेटवस्तू : सुकेश
ईडीच्या चौकशीत सुकेशने सांगितले की, मी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. म्हणूनच मी तिला महागड्या भेटवस्तू दिल्या. या प्रकरणाशी जॅकलिनचा काहीही संबंध नाही, असेही सुकेशने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

जॅकलिन आणि सुकेशचा फोटो व्हायरल झाला होता.
जॅकलिन आणि सुकेशचा फोटो व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झाले होते खासगी फोटो

अभिनेत्रीचे सुकेशसोबतचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर जॅकलिनने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका असे आवाहन केले होते. तिने लिहिले होते, 'या देशाने आणि तेथील जनतेने मला नेहमीच प्रचंड प्रेम आणि आदर दिला आहे. यात माझ्या मीडिया मित्रांचाही समावेश आहे. मी तुमच्या सर्वांकडून काहीतरी शिकले आहे. सध्या मी कठीण काळातून जात आहे. मी मीडियातील माझ्या मित्रांना विनंती करतो की, असे फोटो प्रसारित करू नका, जे खासगी आहेत आणि माझ्या प्रायव्हसीत बाधा आणणारे आहेत. आपण आपल्या प्रियजनांसोबत असे करत नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत असे करणार नाही असा माझा विश्वास आहे. मलाही लवकरच न्याय मिळेल अशी आशा आहे,' अशा आशयाची पोस्ट जॅकलिनने लिहिली होती.

कोण आहे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरू येथील रहिवासी आहेत. लॅव्हिश लाइफस्टाइल जगण्यासाठी त्याने वयाच्या 17 व्या वर्षापासून लोकांची फसवणूक सुरू केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरातील लोकांनाही टार्गेट केले.

सुकेश हा उच्चभ्रू लोकांना फोन करायचा आणि स्वतः मोठा सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. 2007 मध्ये त्याने बंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात 100 हून अधिक लोकांची फसवणूक त्याने केली होती, यावेळी त्याने स्वत:ला बडा सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी सुकेशला अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुकेशने पुन्हा लोकांना फसवण्याचे काम सुरू ठेवले. सुकेशवर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

तामिळनाडूमध्ये तो स्वत:ला माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचा मुलगा असल्याचे सागंत होता. त्याने स्वतःला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा पुतण्या असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...