आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 कोटींच्या मनी लाँड्रिंगमध्ये मोठा खुलासा:जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीसोबतच सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकरही ठग सुकेश चंद्रशेखरच्या निशाण्यावर होत्या

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुकेशने केले खुलासे

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर संबंधित काही नवीन खुलासे झाले आहेत. ज्यामध्ये असे समोर आले आहे की, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही नंतर ठग सुकेशच्या निशाण्यावर आणखी तीन बॉलिवूड अभिनेत्री होत्या. वृत्तानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर या सेलेब्स देखील सुकेशच्या टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे.

सुकेशने केले खुलासे
ईडीच्या तपासात सुकेशने सारा, जान्हवी आणि भूमीची नावे घेतली आहेत. सुकेशने सांगितले की, त्याने मे 2021 रोजी सारा अली खानला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता आणि त्याचे नाव सूरज रेड्डी असे असल्याचे सांगितले होते. या मेसेजमध्ये सुकेशने साराला सांगितले की त्याला तिला कार गिफ्ट करायची आहे. त्याच वेळी सुकेशने खुलासा केला की, त्याची सीईओ पिंकी इराणीने अनेकदा साराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु यात तिला यश आले नाही. पिंकी इराणी ही सुकेश चंद्रशेखरची असोसिएट आहे, जी अभिनेत्रींना सुकेशसोबत बातचीत करण्यासाठी त्यांचा होकार मिळवण्याचे काम करत असे.

जान्हवी कपूर होती सुकेशच्या निशाण्यावर
त्यानंतर सुकेशने पत्नी लीना मारिया पॉलच्या माध्यमातून जान्हवी कपूरवर निशाणा साधला. लीना सलूनची मालक बनून जान्हवीला पहिल्यांदा भेटली होती आणि 19 जुलै 2021 रोजी बेंगळुरूमध्ये तिच्या सलूनच्या उद्घाटनासाठी अभिनेत्रीला आमंत्रित केले. जान्हवीने सलूनच्या उद्घाटनासाठी येण्यास होकार दिला होता. मानधन म्हणून जान्हवीच्या खात्यात 18.94 लाख रुपये देण्यात आले होते. नंतर जान्हवीने तिच्या बँक खात्याचे तपशील ईडीला दाखवले.

सुकेशने भूमीलादेखील आपल्या जाळ्यात अडकवण्याचा केला होता प्रयत्न

सुकेशच्या याच जाळ्यात भूमी पेडणेकरही अडकली. पिंकी इराणीने जानेवारी 2021 मध्ये भूमीशी संपर्क साधला. पिंकीने भूमीला न्यूड एक्सप्रेस पोस्टची एचआर म्हणून स्वतःची ओळख करून दिली. पिंकीने भूमीला सांगितले होते की, तिच्या कंपनीचे ग्रुप चेअरमन सुकेश चंद्रशेखर हे तिचे मोठे चाहते आहेत. त्यांना तिच्याशी खूप मोठ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे आहे. यासोबतच पिंकीने असेही सांगितले होते की, सुकेशला तिला एक कारही गिफ्ट करायची आहे.

काही दिवसांनी सुकेशने भूमीशी संपर्क साधला आणि स्वतःची शेखर अशी ओळख करून दिली आणि सांगितले की तिला एक प्रोजेक्ट आणि कार गिफ्ट करायची आहे. भूमीने चौकशीदरम्यान ईडीला सांगितले की, तिला सुकेश उर्फ ​​शेखरकडून कोणतीही भेट मिळालेली नाही.

काय आहे 200 कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण?

सुकेशने रॅनबॅक्सीचे माजी प्रोमोटर शिविंदर सिंह आणि मालविंदर सिंह यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सुकेशने त्या दोघांच्या पत्नीकडून 200 कोटी रुपये वसूल केले होते. तो स्वतःला पीएमओचा अधिकारी तर कधी गृहमंत्रालयाचा अधिकारी म्हणवून घ्यायचा.

सुकेश आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पाल तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. सुकेशने दिल्लीच्या तिहार कारागृहातून नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता.

200 कोटींच्या खंडणीचा मुख्य आरोपी सुकेश तिहार कारागृहातून अभिनेत्री जॅकलिनला फोन करायचा. सुकेश तिहार कारागृहातून कॉल स्पूफिंग सिस्टीमद्वारे अभिनेत्रीला फोन करायचा. पण त्याने आपली ओळख उघड केली नाही. एजन्सींना सुकेश चंद्रशेखरचे महत्त्वाचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत. याद्वारे तपास यंत्रणांना जॅकलिनसोबत झालेल्या फसवणुकीची माहितीही मिळाली. सुकेश या प्रकरणातील मास्टर माइंड असून तो वयाच्या 17 व्या वर्षीपासून गुन्हेगारीत सामील आहे. ईडीने काही दिवसांपूर्वीच मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा जबाब नोंदवला होता. जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीत चार तास चौकशी केल्यानंतर, तिचे निवेदन मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...