आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 वर्षांची झाली मोनिका बेदी:अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला बघताच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती मोनिका बेदी, 4 वर्ष तुरुंगात काढल्याने उद्धवस्त झाले करिअर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोनिकाला 'सुरक्षा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता.

बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी 46 वर्षांची झाली आहे. 18 जानेवारी 1975 रोजी पंजाबच्या होशियारपूर येथे तिचा जन्म झाला होता. मोनिकाच्या बालपणीच तिचे आईवडील नॉर्वेला गेले होते. मोनिकाचे शालेय शिक्षण भारतात झाले, त्यानंतर ती ऑक्सफोर्ड विद्यापीठात साहित्याचा अभ्यास करण्यासाठी गेली. त्यानंतर ती अभिनयाकडे वळली आणि 1995 मध्ये ती दिल्ली विद्यापीठात अभिनयाच्या शिक्षणासाठी आली.

तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण

शिक्षण सुरु असताना मोनिकाला ताज महल या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पणाची संधी मिळाली. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक रामानायडू यांनी तिला शिवया, स्पीड डान्सर सारख्या चित्रपटांमध्ये कास्ट केले. 1995 मध्येच मोनिकाला 'सुरक्षा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला.

सलेमवर झाली होती फिदा
चित्रपटांपेक्षा मोनिका आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. स्टेज शो दरम्यान तिची भेट अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत झाली होती. सालेमला पाहताच क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली होती. दुसरीकडे अबूही स्टेज शोसाठी पैसे खर्च करत असे आणि या काळात मोनिकाबरोबरच्या त्याच्या गाठीभेटी वाढत गेल्या. दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली आणि असं म्हणतात की त्यांनी लग्नही केले होते.

4 वर्ष तुरूंगात काढली
2006 मध्ये मोनिकाला बनावट बेकायदेशीर कागदपत्रांद्वारे अबू सालेमसह पोर्तुगालमध्ये दाखल झाल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले. लिस्बन शहरातून पकडलेल्या मोनिकाला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली.

मोनिका 2010 मध्ये तुरुंगातून बाहेर आली. आणि पुन्हा एकदा चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही प्रादेशिक चित्रपटांव्यतिरिक्त 2013-14 या काळात 'सरस्वती चंद्र' मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. आता ती तिचे फिटनेस आणि ब्युटी टिप्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

बातम्या आणखी आहेत...