आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मदतीचा हात:सोनू सूदने आता 2000 हून अधिक लोकांना पाठवले घरी, बोरिवली स्टेशनवर निरोप देण्यासाठीही पोहोचला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनू सूद आणि निती गोयल यांचे स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याचे कार्य अनलॉक फेज वनमध्येही सुरु आहे. शुक्रवारी दुपारी मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर 2000 हून अधिक लोकांना निरोप देण्यासाठी सोनू सूद स्वतः हजर होता. सोनूने सुरुवातीला बसेसच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या घरी पाठवले होते, आता तो ट्रेनच्या माध्यमातून स्थलांतरितांना त्यांच्या गावी पाठवण्याचे काम करतोय. 

रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत सोनूने सुमारे 20 हजार लोकांना त्याच्या घरी पाठवले आहे. यात आसाम, ओडिशा आणि उत्तराखंडमधील लोकांचा समावेश आहे. सोनूने काही लोकांसाठी विमानाच्या तिकिटांचाही व्यवस्था केली होती. सोनू हे काम स्वखर्चातून करतोय.

मदतीवरुन राजकारण

यापूर्वी 8 जूनच्या रात्री सोनू सूदला मुंबईच्या वांद्रे टर्मिनल स्थानकाच्या फलाटावर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. तो येथून उत्तर प्रदेशला जाणा-या मजुरांना निरोप देण्यासाठी आला होता. पण आरपीएफने त्याला फलाटावर जाण्यापासून रोखले होते. यावेळी सोनू जवळपास 45 मिनिटे आरपीएफच्या कार्यालयात बसून होता. या घटनेविषयी सोनू म्हणाला होता, 'मला प्लॅटफॉर्मवर जायला मिळाले नाही, यामुळे मला काही फरक पडत नाही. माझे काम मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याचे आहे आणि मी त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे.'

शिवसेनेने केली होती टीका

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 'सामना'तील आपल्या स्तंभातून सोनूवर टीका केली होती. सोनू सूद याच्या रस्त्यावरील अभिनयाचे दिग्दर्शक राजकीय आहेत, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला होता. 'सोनूचा पुढचा राजकीय चित्रपट कोणता? त्याचा खुलासा लवकरच होईल,' असा टोलाही राऊत यांनी हाणला होता. 'महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची फार मोठी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले ते बाबा आमटे. या नावांत आता आणखी एका महान सामाजिक कार्यकर्त्याचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे सोनू सूद! पण इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते?, याबद्दलही राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 

0