आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • More Than 80 Thousand Fake Accounts Created To Publicize Fake Information Related To Sushant's Death, Mumbai Police Begins Investigation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:सुशांतच्या मृत्यूशी संबंधित खोटी माहिती पसरवण्यासाठी 80 हजारांहून अधिक फेक अकाऊंट्स उघडले गेले, मुंबई पोलिसांनी दिला कारवाईचा इशारा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांतच्या कुटूंबियांच्या नावावर सोशल मीडियामध्ये फेक अकाऊंट्स तयार करण्यात आले आणि त्यामार्फत फेक रिपोर्ट्स शेअर करण्यात आले. - Divya Marathi
सुशांतच्या कुटूंबियांच्या नावावर सोशल मीडियामध्ये फेक अकाऊंट्स तयार करण्यात आले आणि त्यामार्फत फेक रिपोर्ट्स शेअर करण्यात आले.
  • मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले, या फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला.
  • 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (एम्स)ने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे आपला फॉरेन्सिक रिपोर्ट सादर केला आहे. ताज्या माहितीनुसार, एम्सने आपल्या रिपोर्टमध्ये सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावली असून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. सीबीआयपूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल 80 हजारांहून अधिक फेक अकाऊंट्स सुरू करण्यात आले होते. त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, या फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणाची चौकशी करून कायद्याचा भंग करणा-यांवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी सायबर सेलला आदेश दिले आहेत.

दिग्विजय सिंह म्हणाले- या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे
हा खुलासा झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी ट्विट केले की, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासाठी 80 हजारांहून अधिक बनावट खात्यांची चौकशी झाली पाहिजे.

इटली, जपान आणि थायलंडसारख्या देशांमधून बनावट खाती उघडण्यात आली
हे फेक अकाऊंटस् फक्त भारतातच नव्हे तर इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स या देशांमध्येही तयार केले गेले. “परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचे काम आम्ही करत आहोत,” असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, अशा मोहिम राबवून मुंबई पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. ते म्हणाले, 'कोरोनाच्या संकटात 84 पोलिसांचा मृत्यू झाला. सहा हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असे असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी आणि प्रतिमा मलीन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचे सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची असभ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आले. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.'

बातम्या आणखी आहेत...