आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना चविष्ट पदार्थ खाऊ घालतात गायिका आशा भोसले:जगभरात डझनभराहून अधिक रेस्तराँ, कुकला शिकवतात स्वतःच्या खास पाककृती

अरुणिमा शुक्ला/अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशा भोसले… महान गायिका. 20 भाषांमध्ये 11 हजारांहून अधिक गाणी गायलेल्या आशाताई आज 90 वर्षांच्या झाल्या आहेत. स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी, पंचमदा नावाने प्रसिद्ध असलेले संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या पत्नी आशा भोसले केवळ गायिकाच नव्हे तर एक यशस्वी उद्योजिकासुद्धा आहेत. बॉलिवूडमधील आपल्या 6 दशकांच्या संगीत प्रवासासह आशाताई 'आशाज् रेस्तराँ'ची कमान सांभाळली आहे.

सध्या गायनाला छोटा ब्रेक देऊन आशाताई त्यांचा रेस्तराँचा व्यवसाय पुढे नेत आहेत. त्यांचे जगभरात एक डझनहून अधिक रेस्तराँ आहेत. पहिले रेस्तराँ त्यांनी दुबईत सुरु केले होते. त्याचे नाव आहे आशाज् रेस्तराँ. आता दुबई, कुवेत, मँचेस्टर आणि इतर अनेक देशांमध्ये त्यांच्या चेन आहेत. यासाठी आशा ताईंनी स्वतः काही पाककृती शोधून काढल्या आहेत.

आशाताईंची एकूण संपत्ती 80 कोटी रुपये आहे. आज वयाच्या 90 व्या वर्षीही त्या तेवढ्याच ऊर्जेने काम करतात. अनेकदा त्या स्वतः त्यांच्या रेस्तराँच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसतात.

आज आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त दिव्य मराठीने त्यांच्याशी खास बातचीत करुन त्यांच्या या भूमिकेबद्दल जाणून घेतले. रेस्तराँ चेन उघडण्याची कल्पना आशाताईंना कशी सुचली, त्या या व्यवसायात कशा आल्या, सर्व काही त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया...

कशी झाली रेस्तराँची सुरुवात?
मी 1943 पासूनच गायनाचा प्रवास सुरू केला आणि आज मी 90 वर्षांची आहे. माझे संपूर्ण आयुष्य मी पार्श्वगायनात काढले. या काळात मुलांना लहानाचे मोठे केले, त्यांचे लग्न लावून दिले. माझी मुलं लहान असताना घरी यायची आणि मला सांगायची की, शेजारच्या काकूंनी किती छान कबाब बनवले, त्यांनी केलेले चिकन चांगले होते. तेव्हा मी त्यांच्यासाठी स्वतः सगळे पदार्थ बनवायचे ठरवले. मग मी स्वयंपाकाकडे वळले. यानंतर माझा मुलगा म्हणाला की, तू तुझ्या डिशवर पुस्तक लिह. मी म्हणाले की, पुस्तके अनेकांनी लिहिली आहेत, म्हणून मी पुस्तक लिहिण्यास नकार दिला. माझ्या मुलाला माझ्या जेवणाची रेसिपी इतरांपर्यंत पोहोचवायची होती, म्हणून त्याने रेस्तराँ उघडण्याचा सल्ला दिला आणि इथूनच रेस्तराँ सुरू झाले.

तुम्ही कुणाकडून स्वयंपाक शिकलात?

मजरूह सुल्तानपुरी यांच्या बेगमशिवाय मी अनेक लोकांकडून स्वयंपाक शिकले. मी अनेक मासिकांमधून पाककृती लिहून ठेवायचे. मी ज्या हॉटेलमध्ये जायचे, तिथल्या शेफला तुम्ही ही डिश कशी बनवली हे विचारायचे. तेदेखील मला त्यांच्या डिशेजच्या रेसिपी सांगायचे. असे करत करत मी ब-याच पाककृती शिकले.

पहिले रेस्तराँ कुठे सुरू झाले?

आमचे पहिले रेस्तराँ दुबईमध्ये सुरू झाले आणि देवाच्या कृपेने हे रेस्तराँ कोरोनाच्या काळातही सुरळीत चालले आणि अजूनही चालू आहे. माझ्या रेस्तराँच्या अनेक देशांमध्ये अनेक फ्रेंचायझी आहेत. मी तिथल्या कुकलादेखील पाककृती शिकवल्या. माझ्या रेस्तराँमधील बरेच स्वयंपाकी लखनऊ आणि पंजाबचे आहेत.

गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी खाण्याशी संबंधित काही किस्सा?

गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी पंचम माझ्याकडे यायचे आणि आशा घरी जाऊन कोळंबी बनवू किंवा कधी एखादा खास पदार्थ बनवू असे म्हणायचे. मी त्यांना सांगायचे की, आधी गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण करु आणि मग घरी जाऊन जेवणाचा बेत करु. पंचम देखील खूप छान स्वयंपाक करायचे आणि मी त्यांच्याकडून अनेक पदार्थ शिकले. मी त्यांच्याकडून कबाब बनवायला शिकले. मी बंगालचे अनेक पदार्थही त्यांच्याकडून शिकले आहेत. दोघांमध्ये चांगले जेवण कोण बनवतो यासाठी माझी आणि पंचमची स्पर्धा असायची.

स्वयंपाक करताना एखादे गाणे शिकलात का?

स्वयंपाक करताना मला माझे एकही गाणे आठवत नव्हते. त्यावेळी मी फक्त इतरांचीच गाणी गुणगुणायचे. त्यावेळी मी फक्त हेमंत कुमार, किशोरदा आणि दीदींचीच गाणी म्हणायचे.

आपण स्वत: रेस्तराँसाठी कोणत्याही डिशचा शोध लावला आहे का?

मी रेस्तराँसाठी फिश बिर्याणी बनवली. याशिवाय मी मूग डाळ वेगळ्या पद्धतीने बनवली, जी सर्वांना खूप आवडते. माझा मुलगा आनंद मला पुन्हा जुने पदार्थ बनवायला सांगतो. जेव्हा मी पुन्हा डिश बनवते तेव्हा ते माझी डिश रेकॉर्ड करतात आणि सेव्ह करतात.

बातम्या आणखी आहेत...