आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होम स्टे डायरी:कार्तिक आर्यनच्या क्लीन शेवचं क्रेडिट त्याच्या आईला, नाराज होऊन अभिनेता म्हणाला - 'मम्मीने चांगली खेळी खेळली'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्तिकने एका मजेदार व्हिडीओद्वारे या क्लिन शेवमागची संपूर्ण स्टोरी सांगितली आहे.

  लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओंद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. बर्‍याच दिवसांपासून दाढी वाढल्यामुळे तो सतत आईचा राग सहन करतोय. मात्र आता कार्तिक आर्यनने क्लिन शेव केली, ज्याचे श्रेय आईला जाते. कार्तिकने एका मजेदार व्हिडीओद्वारे या क्लिन शेवमागची संपूर्ण स्टोरी सांगितली आहे.

अलीकडेच कार्तिक आर्यनने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची आई त्याला भांडे, साडी आणि गाडी मागते. कार्तिक गाडीला दाढी समजतो आणि क्रिएटिव्हिटीने दाढी काढून आईच्या हातात देतो. तेव्हा त्याची आई रागवून त्याला दाढी नव्हे तर गाडी हवी असे सांगते. यावर कार्तिक खूप निराश होतो आणि नंतर आई चांगली खेळी खेळली, असे म्हणतो. 

View this post on Instagram

Mummy Sahi Khel Gayi.. 🚙 🧔🏻

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on May 16, 2020 at 4:09am PDT

आर्यनने काही दिवसांपूर्वीही एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये त्याच्या आईने त्याला म्हटले होते की, जर तू दाढी केली नाही तर तुला जेवण मिळणार नाही. त्यानंतर कार्तिकने लाइव्ह येऊन त्याच्या चाहत्यांकडे त्याच्या लूकविषयी सल्ला मागितला होता. या लाइव्ह सेशलदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोणणे त्याला शेव्ह करण्याचा सल्ला दिला होता.  

बातम्या आणखी आहेत...