आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर्स डे मेमरी:अनन्या पांडेने बालपणीचे व्हिडिओ शेअर करताना सांगितले - मला माझा वेडेपणा येथून मिळाला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनन्याने मदर्स डे निमित्त बालपणीचे दोन व्हिडिओ शेअर केले

मदर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्री अनन्या पांडेने रविवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडिओ शेअर केले. यापैकी एका व्हिडिओत ती आई भावनाबरोबर दिसत आहे, तर दुसऱ्यात ती आईला जगातील सर्वात आवडती व्यक्ती सांगत आहे. हे दोन्ही व्हिडिओ तिच्या बालपणीचे असून चंकी पांडे यांनी शूट केले होते.  

अनन्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिची आई तिच्यासोबत खेळत आहे. या व्हिडिओसह अनन्याने लिहिले, 'माझा वेडेपणा कोठून आला हे स्पष्ट झाले आहे. माझ्या आईला आणि सर्व सुंदर मातांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.'

अनन्याचे आईवर आहे सर्वाधिक प्रेम

दुसऱ्या व्हिडिओत अनन्या वडील चंकी यांच्या प्रश्नांचे उत्तरे देताना दिसत आहे. चंकी तिला विचारतो की, 'तू जगात सर्वाधिक प्रेम कोणावर करेत?' तर उत्तर देताना अन्यना म्हणते की, 'आईला'. यानंतर चंकी पुन्हा विचारतो की, 'आणि दुसऱ्या क्रमांकावर', तर अन्यना म्हणते, 'कोणाशी नाही.' हा व्हिडिओ शेअर करताना अनन्याने लिहिले, 'उत्तर अजूनही तेच आहे. भावना पांडे तुम्हाला खूप सारे प्रेम. त्याला उत्तर म्हणून त्याच्या आईनेही 'लव्ह यू' असे लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...