आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Mother's Day Special | Kareena Kapoor To Helen, Despite Being A Step Mother, These Actresses Maintained A Beautiful Relationship With Children

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मातृदिन अभिमान:करिनापासून ते हेलनपर्यंत, खऱ्या आयुष्यात सावत्र आई असूनही या अभिनेत्री सुंदर नाती सांभाळत आहेत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावत्र आईला नाही स्वीकारू शकले हे कलाकार

कधी नात्यांमधील कटूता तर कधी इतर कोणत्या कारणामुळे आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी दोन लग्न केली आहेत. अशा परिस्थितीत करीना, हेलन आणि हेमा मालिनी अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी अशा व्यक्तीशी लग्न केले आहे ज्यांना यापूर्वी मुले आहेत. मदर्स डेच्या जाणून घेऊयात या अभिनेत्रींनी कशाप्रकारे त्या मुलांना स्वतःचे मानत संपूर्ण परिवाराला जोडत या नात्याला नवीन स्थान दिले आहे. 

करीना कपूर खान- सारा अली आणि इब्राहिम

करीना कपूरने 2012 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केले होते. सैफला पहिली पत्नी अमृती सिंहपासून सारा आणि इब्राहिम दोन मुले आहेत. करीना कपूरने अनेक प्रसंगी सांगितले की ती सारा आणि इब्राहिमची आई नसून एक मित्र आहे. याशिवाय सारा देखील करीनाचे खूप कौतुक करताना दिसली आहे. एका मुलाखती दरम्यान करीनाने सांगितले आहे की सारा आणि इब्राहिम दोघांचे संगोपन चांगले केले आहे. तिला या दोघांसोबत वेळ घालवायला आवडते, यामुळे फॅमिली गॅदरिंगमध्ये तिघांचीही उत्तम बॉन्डिंगही पाहायला मिळते.

हेलन- सलमान खान

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी देखील दोन विवाह केले. सलीम यांच्या दोन्ही पत्नी आजही एकत्र राहतात. सलमा खान यांनी सलमानला जन्म दिली तर हेलेन यांनी सलमासोबत सलमानचे संगोपन केले.  सलमानने या दोघींमध्ये कधीही भेदभाव केला नाही. दोघेही बर्‍याच प्रसंगी एकत्र दिसतात आणि प्रत्येक बाबतीत दोघांचे नातं खूप चांगले आहे.

शबाना आजमी- फरहान आणि जोया अख्तर

शबाना आझमीने जावेद अख्तरशी 1984 साली लग्न केले होते.  यापूर्वी जावेदला पहिली हनी इराणीपासून फरहान आणि झोया ही दोन मुले होती. दुसऱ्या लग्नाच्या एक वर्षानंतर जावेद यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यानंतर फरहान शबानावर खूप चिडला होता.. सुरुवातीला दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते, मात्र वेळेनुसार दोघांनी या नात्याला स्वीकारले. शबाना आणि जावेद यांना स्वतःची मुले नाहीत. 

सुप्रिया पाठक- शाहिद कपूर

शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम पंकज कपूर यांची पहिली पत्नी आहे. पंकज यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्याशी दुसरे लग्न केले होते. सावत्र आई असूनही सुप्रिया शाहिदवर खूप प्रेम करते. अनेक कार्यक्रमांत दोघांना सोबत पाहिले जाते. शाहीद त्याचे सावत्र भावंड सनाह आणि रुहानच्या अगदी जवळ आहे.

स्मृति इराणी- शनेल इराणी

टेलिव्हिजनपासून राजकारणात आपला ठसा उमटविणारी स्मृतीने बालपणीचा मित्र झुबेन इराणीशी लग्न केले आहे, झुबेनला यापूर्वी शनेल ही मुलगी आहे. शनेल स्मृतीच्या दोन मुलांसमवेत त्यांच्यासोबत राहते. तिने आपल्या मुलांसह शनेललाही समान प्रेम दिले आहे. स्मृती तिची सुंदर छायाचित्रेही तिच्या सोशल मीडियावर शेअर करते. 

सावत्र आईला नाही स्वीकारू शकले हे कलाकार 

हेमा मालिनी - सनी देओल आणि बॉबी देओल :

पहिली पत्नी प्रकाश कौर असताना धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला होता. या लग्नामुळे परिवारात दुरावा निर्माण झाला होता. यानंतर बॉबी आणि सनीचे धर्मेंद्र सोबतचे संबंध चांगले झाले, पण आजही दोघांनी हेमाला स्वीकारले नाही.

श्रीदेवी- अर्जुन कपूर : 

श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी बोनी कपूरने आपली पहिली पत्नी मोना कपूरशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अर्जुन, अंशुला आणि बोनी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. दोघांनी श्रीदेवीला वडीलांची पत्नी म्हणून स्वीकार केले मात्र तिला कधी आईचा दर्जा दिला नाही. मात्र, श्रीदेवीचे निधन झाल्यानंतर अर्जुन आता तिच्या मुली जान्हवी आणि खुशीच्या खूप जवळ आला आहे.

बातम्या आणखी आहेत...