आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाची चर्चा:अभिनेत्री मौनी रॉयला आयुष्याचा जोडीदार गवसला, जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा नवरा!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मौनी सध्या तिच्या लग्नाच्या तयारी व्यस्त आहे.

छोट्या पडद्यानंतर सिल्व्हर स्क्रिनवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय हिला आयुष्याचा जोडीदार गवसला असून लवकरच ती लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मौनी लवकरच तिच्या प्रियकरासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

.
.

वृत्तानुसार, मौनी सध्या तिच्या लग्नाच्या तयारी व्यस्त आहे. तिचा होणारा नवरा हा दुबई स्थित एक बँकर असून सूरज नांबियार असे त्याचे नाव आहे. गेल्या काही काळापासून मौनी सतत दुबईची वारी करत आहे. इतकेच नाही तर दुबईत अनेकदा तिला सूरजसोबत बघितले गेले. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली.

दरम्यान, मौनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यात तिने बोटातील अंगठी दाखवली होती. त्यानंतर सूरजसोबत तिचा साखरपुडा झाल्याची चर्चा रंगली होती. याशिवाय तिने सूरजसोबत काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने सूरजसोबतचं नातं जाहीर केलं होतं.

28 डिसेंबर 1985 मध्ये बिहारमध्ये जन्मलेल्या मौनीने 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कस्तूरी' आणि 'पति पत्नी और वो' सारख्या अनेक प्रसिध्द शोमध्ये काम केले आहे. परंतु तिला 'देवों के देव महादेव'मधून प्रसिद्धी मिळाली होती. असे म्हटले जाते की, याच शोच्या सेटवर महादेवाची भूमिका साकारणा-या मोहित रैनासोबत तिचे सूत जुळले होते. परंतु दोघांनीही कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. 'नागिन' या मालिकेमुळेही मौनी प्रसिद्धीझोतात राहिली. मौनीने अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटात स्क्रिन शेअर केले. आता लवकरच ती रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह ब्रह्मास्त्र या चित्रपटात झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...