आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:मॅगझिन शूटसाठी अबू धाबीला गेली होती मौनी रॉय, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून मैत्रिणीच्या घरी अडकली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अबू धाबीमध्ये मौनी रॉय गेल्या दोन महिन्यांपासून राहतेय.

अभिनेत्री मौनी रॉय लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून अबू धाबीमध्ये अडकली आहे. ती तिथे चार दिवसांसाठी एका मॅगझिन शूटच्या निमित्ताने गेली होती. मात्र त्याचकाळात लॉकडाऊन घोषित झाला आणि ती भारतात परतू शकली नाही. मौनी आता तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या घरी राहात आहे.

याबद्दल तिने मिड-डेशी बोलताना सांगितले, 'शूट संपल्यानंतर मी अबू धाबीत दोन आठवडे राहण्याचा निर्णय घेतला होता, कारण माझा पुढचा प्रोजेक्ट 15 एप्रिलला शूट होणार होता. जगभरात लॉकडाऊन होईल याची मला कल्पना नव्हती. मी अबु धाबीमध्ये फक्त चार दिवसांच्या कपड्यांसह अडकली.'

  • मौनीला सतावतेय कुटुंबाची काळजी

मौनीचे कुटुंब कूच बिहारमध्ये वास्तव्याला आहे. त्यांच्यासाठी ती खूप चिंताग्रस्त आहे. मौनी म्हणाली, मी रोज त्यांना कॉल करते. माझा भाऊ माझ्या आईबरोबर राहत आहे याचा मला आनंद झाला आहे. माझ्या चुलत भावाचे घरही माझ्या घराजवळच आहे. सध्या मी खूप अस्वस्थ आहे.

या क्षणी जगातील प्रत्येकजण एका वाईट टप्प्यातून जात आहे, त्यामुळे माझ्याजवळ राहायला घर आणि कुटुंब आहे, याचे मला समाधान आहे. मी भारतात परतण्यासाठी आतुर झाले आहे.  

मौनी 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार : '

देवों  के देव महादेव' या टीव्ही मालिकेतून मौनी घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने  अक्षय कुमारसह ‘गोल्ड’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'मेड इन चाइना', 'रोमियो अकबर वॉल्टर' या चित्रपटांमध्येही तिने काम केले.  'ब्रह्मास्त्र' हा तिचा आगामी चित्रपट असून त्यात ती रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...