आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:सूरज नांबियारसोबत जानेवारीत लग्नाच्या बेडीत अडकणार मौनी रॉय, अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला - दुबई किंवा इटलीमध्ये होणार लग्नसोहळा

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मौनी पुढील वर्षी जानेवारीत सूरजसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. ती दुबईतील बिझनेसमन सूरज नांबियार सोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याच्याशी लवकरच लग्नही करणार आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे दोघे अनेकदा सोबत दिसले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मौनी पुढील वर्षी जानेवारीत सूरजसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मौनीने तिच्या वाढदिवशी सूरजची पोस्ट हार्ट इमोजीसह शेअर करताना लिहिले होते, "दोन्ही माझे..... आय लव्ह यू".

दुबई किंवा इटलीमध्ये होणार वेडिंग फंक्शन
वृत्तानुसार, मौनीचा भाऊ विद्युत रॉयसरकर याने लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा विवाह सोहळा दुबई किंवा इटलीमध्ये आयोजित केला जाईल, कारण या जोडप्याला हा कार्यक्रम अतिशय खासगी ठेवायचा आहे. याशिवाय मौनी आणि सूरज यांनी त्यांचे मुळगाव पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथे मित्र आणि कुटुंबासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे. मौनी आणि सूरज 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत.

मौनीचे नवीन प्रोजेक्ट्स
मौनी रॉय लवकरच दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नागार्जुन देखील महत्त्वाच्या भूमिकेत असतील. काही दिवसांपूर्वी ती 'दिल गलती कर बैठा है' या म्युझिक व्हिडिओमध्ये गायक जुबिन नौटियालसोबत दिसली होती.

यावर्षी मौनीने तिचा वाढदिवस गोव्यात मित्रांसोबत साजरा केला. यादरम्यान तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले होते.

बातम्या आणखी आहेत...