आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ट्रेलर:सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दोन तासात 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला 'दिल बेचारा'चा ट्रेलर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चे ट्रेलर सोमवारी रिलीज झाले. सुशांतचे चाहते याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. या ट्रेलरबद्दल लोकांची उत्सुकता इतकी वाढली होती की, युट्यूबवर अपलोड होताच, फक्त दोन तासात 5  लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर पाहिला. हा चित्रपट येत्या 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल आणि सर्व (सब्सक्राइबर्स आणि नॉन-सब्सक्राइबर्स)  याला पाहू शकतील.

अडीच मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये सुशांतच्या अभिनयाची छाप दिसून येते. ट्रेलरमध्ये सुशांतचे अनेक चांगले डायलॉग्स आहेत. या संवादातून चित्रपटात कँसरग्रस्त रुग्ण असलेल्या संजना संघीला तो हसवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

मुकेश छाब्राचे दिग्दर्शन

'दिल बेचारा' कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. सुरुवातील या चित्रपटाचे नाव 'कीजी और मैनी' होते, पण फेब्रुवारी 2019 मध्ये याचे नाव 'दिल बेचारा' करण्यात आले. हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या जॉन ग्रीनची कादंबरी 'द फॉल्ट इन आवर स्टार्स'वर आधारित आहे. यावर 2014 मध्ये हॉलीवूडमध्ये चित्रपटही आला आहे.

0