आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Movie Review: John Abraham's Satyamev Jayate 2 Film Is Full Of Strong Action And Excellent Dialogues, Divya Kumar Khosla Got Full Support

मुव्ही रिव्ह्यू:जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते 2'मध्ये अ‍ॅक्शनचा धमाका आणि दमदार संवाद, लक्ष वेधून घेते दिव्या कुमार खोसला

एका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारा चित्रपट

मिलाप झवेरी दिग्दर्शित 'सत्यमेव जयते 2' हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जॉन अब्राहमने चित्रपटात तीन वेगवेगळे पात्र साकारले आहे. एकीकडे, जॉनने सत्य बलराम आझाद (गृहमंत्री) आणि जय बलराम आझाद (पोलीस) या जुळ्या भावांची भूमिका साकारली आहे, तर तिसरी भूमिका त्याचे वडील दादासाहेब बलराम आझाद यांची आहे. म्हणजेच वडील आणि जुळ्या मुलांच्या भूमिकेत तो दिसतोय.

काय आहे चित्रपटाची कथा?
ही कथा आझाद कुटुंबाभोवती फिरते. सत्य आझादला भ्रष्टाचार विरोधी विधेयक मंजूर करायचे आहे पण संपूर्ण विरोधक त्याच्या विरोधात आहेत. यात त्याची पत्नी विद्या म्हणजे दिव्या कुमार खोसलादेखील सामील आहे. शेतकरी दादासाहेब बलराम आझाद यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला भ्रष्टाचारमुक्त भारत हवा आहे. त्यांची दोन्ही मुले सत्य बलराम आझाद आणि जय बलराम आझाद त्यांच्या वडिलांच्या त्या स्वप्नाला आकार देण्याच्या प्रयत्नात आहेत.

चित्रपटात दमदार संवाद
जॉनच्या तीन पात्रांच्या एंट्री आणि बोलण्यातून त्याची पर्सनॅलिटी दिसून येते. ‘जिस देश की मैया गंगा है, वहां खून भी तिरंगा है’, ‘पंखे पर झूल रहा किसान है, गड्ढे में पूरा जहान है, फिर भी भारत महान है’ आणि ‘तन मन धन’ से बड़ा है ‘जण, गण, मन’ असे दमदार संवाद लक्ष वेधून घेतात.

चित्रपटात अ‍ॅक्शनचा भरणा
संवाद आणि स्क्रीन प्ले या दोन्हीमध्ये भरपूर अ‍ॅक्शन आहे. म्हणजेच अ‍ॅक्शनप्रेमींसाठी हा चित्रपट फुल टाइमपास आहे. आता या चित्रपटाची नायिका दिव्या कुमार खोसलाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट म्हणजे तिचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन म्हणता येईल.

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारा चित्रपट
उड्डाणपूल कोसळणे, रुग्णालयात ऑक्सिजनअभावी मुलांचा मृत्यू, मिड डे मिल अशा अनेक बाबी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या मुद्द्यांशी सर्वसामान्य कनेक्ट करु शकतो.

श्रवणीय आहे चित्रपटाचे संगीत
चित्रपटाचे संगीत तुम्हाला थिरकायला लावणारे आहे. नोरा फतेहीचे चार्टबस्टर कुसु-कुसु गाणे लोकांच्या ओठांवर आधीपासूनच रेंगाळत आहे, परंतु मोठ्या पडद्यावर हे गाणे पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. पटकथेच्या बाबतीत हा चित्रपट थोडा मागे पडतो आणि अतिरिक्त अ‍ॅक्शन सुद्धा प्रेक्षकांना थोडं इरिरेट करु शकते. पण जर तुम्ही जॉनच्या चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल.

(इनपुट- अमित कर्ण)

बातम्या आणखी आहेत...