आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नॅशनल सिनेमा डे'ला खास ऑफर:16 सप्टेंबरला देशभरातील सिनेमागृहांमध्ये केवळ 75 रुपयांमध्ये मिळणार तिकीट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

16 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने भारतीयांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील सिनेमागृहांनी 16 सप्टेंबर रोजी भारतात 'राष्ट्रीय चित्रपट दिना'च्या निमित्ताने 75 रुपयांना तिकीट विक्रीचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने प्रथम कमी केले तिकिटांचे दर
3 सप्टेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने अमेरिकेतील चित्रपटगृहांनी घोषित केले आहे की, ते 3 सप्टेंबर रोजी त्यांच्या 'नॅशनल सिनेमा डे'ला 3 डॉलर म्हणजे साधारणपणे 239 रुपयांच्या किमतीत सिनेमाची तिकिटे विकणार आहेत.

सर्व सिनेमा हॉलमध्ये मिळेल सवलत
ही सुविधा केवळ सामान्य चित्रपटगृहांमध्येच नाही तर PVR, INOX, Cinépolis, Mirage, Carnival आणि Wave यासह अनेक ठिकाणी उपलब्ध असेल. सिनेमा हॉलमध्ये सिनेमाचा आनंद घेण्यासाठी साधारणपणे 200 ते 300 रुपये खर्च करावे लागतात, त्यामुळेच बहुतांश लोक सिनेमा हॉलमध्ये जाण्याचे टाळतात. पण जर तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट स्वस्त दरात बघायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिन का साजरा केला जातो?
कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बराच काळ बंद होती, त्यामुळे चित्रपटगृहांचे बरेच नुकसान झाले. तथापि, आता गोष्टी हळूहळू सामान्य होत आहेत, त्यामुळे चित्रपटगृहांना चित्रपट प्रेमींना थिएटरमध्ये आणायचे आहे. या मोहिमेशी सुमारे 4000 चित्रपटगृहे जोडली जातील, ज्यात 16 सप्टेंबर रोजी कमी किमतीत चित्रपट दाखवला जाईल.

तिकीट कसे काढायचे?
अवघ्या 75 रुपयांत तिकीट घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा हॉलच्या बाहेरून तिकीट खरेदी करावे लागेल. याशिवाय, तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही तिकीट खरेदी करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला जीएसटी आणि इंटरनेट शुल्क भरावे लागेल.

'ब्रह्मास्त्र'चे तिकीट फक्त 75 रुपयांना
रणबीर-आलियाचा ब्रह्मास्त्र चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांना 16 तारखेला अवघ्या 75 रुपयांमध्ये चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. मात्र, उर्वरित दिवसासाठी तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणेच असतील.

बातम्या आणखी आहेत...