आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मूव्ही अपडेट:पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार वरुण-साराचा 'कुली नंबर 1'; चित्रपट निर्मात्यांनी निश्चित केली नवी रिलीज डेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सद्य परिस्थिती पाहता अन्य काही चित्रपट पुढील वर्षासाठी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

सध्या जगात सुरू असलेल्या कोरोना साथरोगामुळे एंटरटेन्मेंट इंडस्ट्री पूर्णपणे गडबडली आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले तर काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही प्रदर्शित झाले नाहीत. आता सर्व निर्माते एकतर ओटीटीचा सहारा घेत आहेत किंवा चित्रपट पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलत आहेत. अजय देवगणच्या 'मैदान' नंतर वरुण धवनचा 'कुली नंबर 1' पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 

सारा-वरुणचा चित्रपट 'कुली नंबर 1' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशा बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. मात्र निर्मात्यांनी याला दुजोरी दिला नाही. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, चित्रपटांच्या निर्मात्यांनी अलिकडेच एक मीटिंग घेतली होती. या बैठकीत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसंदर्भात चर्चा झाली. अखेर पुढील वर्षी जानेवारीत हा चित्रपट रिलीज करण्यास सर्वांनी सहमती दर्शविली. आता रिपोर्टनुसार 1 जानेवारी 2021 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

'कुली नं 1' चित्रपट आधी 1 मे रोजी प्रदर्शित केला जाणार होता. मात्र लॉकडाउनमुळे रिलीज केला नाही. याशिवाय अजय देवगणचा 'मैदान' देखील पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत टाळण्यात आला आहे.  सद्य परिस्थिती पाहता अन्य काही चित्रपट पुढील वर्षासाठी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

0