आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब VFX मुळे पोस्टपोन झाला 'आदिपुरुष':'ब्रह्मास्त्र'पासून ते 'सुल्तान'पर्यंत, कधी BO क्लॅश तर कधी कोरोनामुळे बदलली प्रदर्शनाची तारीख

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आदिपुरुष' या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. चित्रपटात चुकीची तथ्ये दाखवण्यात आल्याचा आरोप होतोय. तसेच चित्रपटाती 250 कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या व्हीएफएक्सवरही टीका होतेय.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाची नवीन तारीख उघड केली . आधी हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीत रिलीज होणार होता पण आता हा चित्रपट जून 2023 मध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे बजेट 400 कोटी होते, मात्र आता चित्रपटातील VFX सुधारण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, त्यामुळे चित्रपटाचे बजेट 500 कोटी होणार आहे.

रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आलेला हा पहिलाच चित्रपट नाही. याआधीही अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा काही कारणांमुळे बदलल्या आहेत. अशा चित्रपटांबद्दल जाणून घेऊया-

आरोपांमुळे 'जर्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला

शाहिद कपूरचा 'जर्सी' हा चित्रपट 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहात येणार होता, परंतु रिलीजच्या काही दिवस आधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. KGF 2चा बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टाळण्यासाठी चित्रपटाची रिलीजची तारीख बदलण्यात आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण नंतर निर्मात्यांनी स्पष्ट केले होते की, चित्रपटाच्या कथेवर साहित्यिक चोरीचा आरोप आहे, ज्यामुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली. लेखक रजनीश जैस्वाल यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा त्यांचीच असल्याचा आरोप करत निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. या प्रकरणाची सुनावणी पाहता निर्मात्यांनी एक दिवस आधीच चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर हा चित्रपट 22 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

कोविडमुळे या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला
कोविडमुळे 'RRR', 'गंगुबाई काठियावाडी' आणि 'ब्रह्मास्त्र'सह अनेक चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा बदलण्यात आल्या. 2019 किंवा 2020 मध्ये हे चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार होते, परंतु कोविडमुळे, चित्रपट 2022 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.

दोन्ही स्टार्सचे 'रईस' आणि 'सुल्तान' हे चित्रपट जुलै 2016 मध्ये रिलीज होणार होते. 'रईस'चे प्रदर्शन निर्मात्यांनी 27 जानेवारी 2017 पर्यंत पुढे ढकलेले जेणेकरुन चित्रपटांच्या क्लॅशचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये.

'लाल सिंग चड्ढा' आणि 'बच्चन पांडे' हे चित्रपट 2022 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार होते. पण आमिर खानच्या विनंतीनंतर अक्षयचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी रिलीज झाला. मात्र, नंतर 'लाल सिंग चड्ढा'देखील 11 ऑगस्ट रोजी ख्रिसमसच्या आधीच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात आला होता.

हृतिक रोशनने त्याच्या 'सुपर 30' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली आहे. त्याच दिवशी कंगनाचा 'जजमेंटल हैं क्या' हा चित्रपट रिलीज होणार होता. हृतिकने पोस्ट शेअर करून माहिती दिली होती की, कोणत्याही वादाला सामोरे जावे लागू नये म्हणून त्याने निर्मात्यांना रिलीजची तारीख बदलण्याची विनंती केली आहे. हृतिक आणि कंगना एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर कंगनाने हृतिकवर अनेक आरोपही लावले होते, त्यामुळे दोघेही बराच काळ वादात अडकले होते, त्यामुळे हृतिकला पुन्हा हा धोका पत्करायचा नव्हता. बदलानंतर, 12 जुलै 2019 रोजी 'सुपर 30' रिलीज झाला आणि 'जजमेंटल है क्या' 26 जुलै 2019 रोजी थिएटरमध्ये आला होता.

बातम्या आणखी आहेत...