आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुव्हिंग इन विथ मलायका’मध्ये पोहोचली भारती सिंग:'तुम्ही काय तिचे वडील आहात?', मलायकाच्या ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती आपल्या खासगी आयुष्याबद्दल मनमोकळे बोलताना दिसतेय. पण यामुळे ती अनेकदा ट्रोलही होत आहे. पण आता मलायकाला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सडेतोड उत्तर दिले आहे.

भारतीने केली टीकाकारांची बोलती बंद
मलायकाच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या कार्यक्रमात नुकतीच कॉमेडियन भारती सिंगने हजेरी लावली. मलायकाने या नव्या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात मलायका भारतीसमोर ट्रोलर्सनी केलेल्या कमेंट्स वाचताना दिसतेय.

एका ट्रोलरने मलायकाच्या एका फोटोवर 'या वयात तू कसे कपडे घालतेस!' अशी केलेली कमेंट तिने वाचली. त्या कमेंटवर भारती सिंगने तिच्या हटके अंदाजात उत्तर दिले. ती म्हणाली, 'तुम्ही काय तिचे वडील आहात? तिची मर्जी, तिला जे हवे ते कपडे ती घालू शकते. जे लोक ट्रोल करतात त्यांनी एकदा आपल्या समोर बसून ट्रोल केले पाहिजे. म्हणजे त्यांच्यासमोरच आपण त्यांची बोलती बंद करू शकू,' असे भारती म्हणाली.

मलायकाच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या कार्यक्रमात वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होतात. आतापर्यंत फराह खान, करण जोहर, नोरा फतेही यांसारख्या स्टार्सनी या कार्यक्रमात हजेरी लावली आणि हे सर्वच एपिसोड चांगलेच गाजले आहेत.

बातम्या आणखी आहेत...