आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेट वेल सून:किरण खेर यांच्या आजारावर पती अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले - ‘ती लढाऊ वृत्तीची या आजारावर ती लवकर मात करेन’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरण खेर यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

अभिनेते अनुपम खेर यांची पत्नी आणि चंदीगडमधून खासदर असलेल्या किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. मुुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. स्वत: अनुपम यांनी याची माहिती दिली.

अनुपम यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत लिहिले की, 'अफवा पसरू नयेत म्हणून मी ही बातमी शेअर करत आहे. मी आणि सिकंदर ही माहिती देत आहाेत. किरणला मल्टिपल मायलोमा एका प्रकारचा ब्ल्ड कॅन्सर आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. यातून ती लवकर बरी होऊन बाहेर येईल याचा आम्हाला विश्वास आहे. आमचे नशीब चांगले आहे. किरणला चांगल्या डाॅक्टरांची टीम मिळाली आहे. ती पहिल्यापासून लढाऊवृत्तीची आहे. आणि ती या आजारावर लवकर मात करेन. तिची प्रकृती स्थिर आहे. किरणसाठी प्रार्थना करा... आणि असेच प्रेम करत राहा.'

अनुपम खेर यांच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट करत किरण खेर लवकर ब-या व्हाव्यात म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे. अभिनेत्री कंगना रनोट, परिणीती चोप्रा, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी किरण खेर यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी 31 मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला खासदार किरण खेर या अनुपस्थित होत्या. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आता अनुपम खेर यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

किरण 1983 मध्ये चित्रपटांमध्ये आल्या होत्या

किरण यांनी 1983 मधील ‘आसरा प्यार दा’ या पंजाबी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील त्यांचा पहिला चित्रपट 'पेस्तोंजी' (1988) होता. सरदार बेगम (1996) या हिंदी चित्रपटासाठी त्यांना प्रथमच राष्ट्रीय (विशेष ज्युरी) चित्रपट पुरस्कार मिळाला. 'बारीवाली/द लेडी ऑफ द हाउस' (1999) या बंगाली चित्रपटासाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या इतर लोकप्रिय चित्रपटांमध्ये देवदास '(2002),' वीर जारा '(2004),' ओम शांती ओम '(2007) आणि' ब्यूटीफुल '(2014) यांचा समावेश आहे.

किरण खेर यांचे वैयक्तिक आयुष्य

किरण यांचे पहिले लग्न मुंबईतील व्यावसायिक गौतम बैरीसोबत झाले होते, या दोघांना एक मुलगा सिकंदर आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांत दोघे विभक्त झाले. त्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांच्याशी त्यांनी लग्न केले. अनुपम आणि किरण यांना स्वतःचे मुल नाही.

बातम्या आणखी आहेत...