आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सपिरिमेंटल बॉलिवूड:'मिस्टर इंडिया' आहे बॉलिवूडचा पहिला हिट फिक्शनल चित्रपट, 'ब्रह्मास्त्र'पूर्वी या चित्रपटांनी केली मोठी कमाई

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या धाटणीचे चित्रपट भारतात फार क्वचितच तयार झाले आहेत.

रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन स्टारर 'ब्रह्मास्त्र' या बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात रणबीर शिवाच्या आणि आलिया ईशाच्या भूमिकेत आहेत. या दोघांसह ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांची झलक पाहायला मिळतेय. अमिताभ यांच्या दमदार, भारदस्त आवाजाने ट्रेलरची सुरुवात होते. व्हिडिओमध्ये अमिताभ म्हणताहेत, ‘अग्नि, जल, वायू, प्राचीन काल से हमारे बीच कुछ ऐसी शक्तियां हैं जो अस्त्रों में भरी हुई हैं। ये कहानी है इन सारे अस्त्रों के देवता की ‘ब्रह्मास्त्र’। और एक ऐसे नौजवान की जो इस बात से अंजान है कि वो ‘ब्रह्मास्त्र’ के किस्मत का सिकंदर है ‘शिवा.’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर शिवाच्या भूमिकेत दिसत असून, त्याच्याजवळ चमत्कारी शक्ती आहेतस. पण त्याला आपल्याजवळ असलेल्या शक्तीची जाणीव नसते.

तो आगीजवळ जातो, मात्र आग त्याला जाळू शकत नाही. यामुळे रणबीरला असे वाटते की आगीसोबत त्याचे जुने नाते आहे. यानंतर आलियाची एंट्री होते. नागार्जुन आणि मौनी नकारात्मक भूमिकेत दिसतात. ट्रेलर पाहून हे लक्षात येते की या चित्रपटात सायन्स, फिक्शन आणि मायथॉलॉजीचा संगम आहे. चित्रपटात आलिया आणि रणबीरमधील केमिस्ट्रीही दाखवण्यात आली आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार कऱण्यात आला आहे. हा बॉलिवूडचा सर्वात महागडा फिक्शन चित्रपट ठरणार आहे. या धाटणीचे चित्रपट भारतात फार क्वचितच तयार झाले आहेत, पण त्यापैकी अनेक चित्रपटांनी कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. एक नजर टाकुया अशाच काही फँटसी आणि फिक्शन चित्रपटांच्या कलेक्शनवर -

मिस्टर इंडिया

1987 मध्ये प्रदर्शित झालेला 'मिस्टर इंडिया' हा भारतातील पहिला सर्वात हिट सुपरहिरो चित्रपट होता. गायब झालेल्या बँडची वेगळी कथा या चित्रपटातून समोर आली होती. भारताव्यतिरिक्त चीनमध्येही हा चित्रपट हिट ठरला होता. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे पुरस्कार चित्रपटाला मिळाले होता. या चित्रपटाने एक नवीन ट्रेंड सुरू केला होता. 'मिस्टर इंडिया'ला कल्ट क्लासिकचा दर्जा देण्यात आला. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

कोई मिल गया

राकेश रोशन दिग्दर्शित 'कोई मिल गया' हा चित्रपट एलियनवर आधारित पहिला सायन्स फिक्शन चित्रपट होता. या चित्रपटात दिसणारी एलियनची जादू देशभरात चांगलीच पसंतीस उतरली होती. या चित्रपटाने बजेटपेक्षा तिप्पट कमाई केली होती. हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होता, ज्याचे शेवटचे दोन चित्रपट 'यादें' आणि 'आप मुझे अच्छे लगने लगें' फ्लॉप ठरले होते. हृतिकच्या करिअरची दुसरी इनिंग 'कोई मिल गया' या चित्रपटाने सुरू झाली होती.

क्रिश

'कोई मिल गया'चा सिक्वेल चित्रपट 'क्रिश' 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. आधीच्या 'कोई मिल गया' या चित्रपटात रोहित आणि एलियनची जादू दाखवण्यात आली होती, तर या चित्रपटाने रोहितचा मुलगा क्रिश याची ओळख करून दिली होती, ज्याच्याकडे विशेष शक्ती आहे. 'क्रिश' रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाची क्रेझ एवढी होती की, 'क्रिश'चा मास्क बाजारात आला. सुपरहिरो कॅरेक्टर म्हणून क्रिशचे पोस्टर्स वापरले जाऊ लागले. भारतात अनेक सुपरहिरो चित्रपट बनले पण 'क्रिश' हा भारताचा पहिला सुपरहिरो ठरला.

क्रिश 3

'कोई मिल गया'चा तिसरा भाग 'क्रिश 3' 2013 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात हृतिक रोशन, कंगना रनोट, प्रियांका चोप्रा, विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पहिल्या दोन भागांप्रमाणेच हाही चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने 93 कोटींच्या बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई केली होती.

रा.वन

शाहरुख खान आणि करीना कपूर स्टारर 'रा.वन' या चित्रपटात पहिल्यांदाच एका रोबोटला सुपरहिरो बनवण्यात आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा 50 कोटींची अधिकची कमाई केली होती, परंतु समीक्षकांनी हा चित्रपट फ्लॉप घोषित केला. चित्रपटाची थीम एका गेमवर आधारित होती, ज्याची पात्रे खऱ्या जगात येतात.

पीके​​​​​​​​​​​​​​

आमिर खान आणि अनुष्का शर्मा स्टारर चित्रपट 'पीके' 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. ही एक काल्पनिक कथा होती, ज्यामध्ये एक एलियन भारतात अडकतो. नवीन संकल्पना घेऊन आलेल्या या चित्रपटाने 854 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. राजकुमार हिराणी लवकरच त्याचा सीक्वेल घेऊन येणार आहेत, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे.

लव्ह स्टोरी 2050

2008 मध्ये रिलीज झालेला 'लव्ह स्टोरी 2050' हा एक काल्पनिक चित्रपट होता. त्यात 2050ची रोबोटिक लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि हरमन बावेजा मुख्य भूमिकेत होते.

बातम्या आणखी आहेत...