आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलंबो - श्रीलंकेत ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेदरम्यान एक विचित्र घटना घडली. वास्तविक पुष्पिका डिसिल्व्हाला स्पर्धेच्या जेतेपदाचा मुकुट घालण्यात आला. मात्र काही क्षणातच तिच्याकडून तो मुकूट हिसकावून घेण्यात आला. या स्पर्धेत मिसेस श्रीलंका 2019चे विजेतेपद पटकावणारी कॅरोलिन परीक्षक म्हणून सहभागी झाली होती.
कॅरोलिनने पुष्किकाची विजेती म्हणून घोषणा केली आणि तिला विजेतेपदाचा मुकूटदेखील घालण्यात आला. मात्र काही वेळाने कॅरोलिन मंचावर आली आणि पुष्पिकाचा मुकुट हिसकावत म्हणाली, हिचा घटस्फाेट झाला आहे, हा मुकुट उपविजेतीला दिला पाहिजे. या झटापटीत पुष्पिकाच्या डोक्याला दुखापत झाली व तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. हा कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होत होता. नंतर आयोजकांनी चाैकशी केली असता डिसिल्व्हा घटस्फाेटित नसल्याचे कळले आणि माफी मागत त्यांनी तिला पुन्हा मुकुट प्रदान केला. पुष्पिका आपल्या नव-यापासून वेगळी राहते. कायदेशीररित्या तिचा घटस्फोट झालेला नाही.
वृत्तानुसार, कोलंबो पोलिसांनी कॅरोलिनला पुष्पिकाचे मुकूट हिसकावत तिचे केस खेचल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिस अधिकारी अजित रोहाना यांनी याबाबत माहिती देत म्हटले, ‘आम्ही परीक्षक आणि (तिचा सहकारी) चुला मनमेंद्रला मारहाण आणि नेलम पोकुना (थेएटर) नुकसानीच्या आरोपाखाली अटक केली आहे.’
पुष्पिका म्हणाली - मी सर्वांना माफ करते पण मी ही घटना विसरु शकत नाही
पुष्पिकाकडून मुकूट हिसकावून घेतल्यानंतर ती तेथून बाहेर पडली. बाहेर आल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ती म्हणाली, 'या संपूर्ण घटनेने मी खूप निराश झाले आहे. जर एखाद्या महिलेच्या प्रगतीपथावर अडथळा निर्माण करण्याचा आणि तिला दुखावून आनंद मिळवण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्यात कुणाचा विजय नाही तर पराभवच आहे. जर कुणालाही वाटतं असेल की असे करुन मला रोखता येईल तर ते शक्य नाही. माझ्यासारख्या एकल मातांना श्रीलंकेच्या समाजात अनेक अडचणींना सामोरे जाव लागतं. हा मुकुट फक्त माझा नाही तर सर्व महिलांचा आहे. माझ्या या विजयामुळे जर त्यांना प्रेरणा मिळतेय तर तीच माझ्यासाठी सर्वात समाधानाची गोष्ट आहे. मी या प्रकरणातील सर्वांना माफ करते, देव सर्वांना प्रेम करायला शिकवतो, द्वेष नाही.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.