आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू साँग:जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूरवर चित्रीत झालेले ‘गल्ला गोरियां’ गाणे रिलीज, व्हिडीओत डब्बू अंकलही झळकले  

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे गाणे 'बाटला हाऊस' या चित्रपटाच्या वेळी चित्रीत करण्यात आले होते.

‘बाटला हाऊस’मध्ये एकत्र काम केलेले जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूर यांच्यावर चित्रीत झालेले ‘गल्ला गोरियां’ हे गाणे गुरुवारी टी-सीरिजने आपल्या यूट्युब चॅनलवर रिलीज केले आहे. हा म्युझिक व्हिडिओ एका लग्नसमारंभाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आला आहे. यात मृणाल लग्नात सहभागी झालेल्या जॉनला इम्प्रेस करताना दिसत आहे. यात ती जॉनसोबत आपल्या लग्नाचे स्वप्नदेखील रंगवताना दिसतेय.

व्हिडीओत मृणाल हिरव्या रंगाच्या लहेंग्यात दिसतेय, तर जॉनने ब्लॅक कलरची शेरवानी परिधान केली आहे. व्हायरल व्हिडीओतून प्रसिद्धीझोतात आलेले डब्बू अंकल उर्फ संजीव श्रीवास्तव हेदेखील मृणालसोबत ताल धरताना या व्हिडीओत दिसत आहेत.

ध्वनी भानूशालीचा स्वरसाज 

टी-सिरीजच्या या नवीन पार्टी साँगला ध्वनी भानुशालीने गायले आहे. या गाण्याची रचना ब्रिटनमधील कोरिओग्राफर-गायक ताज याने केली आहे. तर व्हिडीओचे दिग्दर्शन आदिल शेख यांनी केले आहे. असे म्हटले जाते की, या दोन्ही स्टार्सवर हे गाणे 'बाटला हाऊस' या चित्रपटाच्या वेळी चित्रीत करण्यात आले होते. पण चित्रपटाच्या मूडसोबत हे गाणे मॅच झाले नाही, म्हणून आता ते स्वतंत्र अल्बमच्या रुपात रिलीज करण्यात आले आहे. 

मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली गाण्याची लिंक 

मृणालने या गाण्याची लिंक आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या गाण्याबद्दल मृणाल सांगते, ‘मी प्रथमच असे टिपिकल नृत्य-गाणे करत आहे. यासाठी मला दोन आठवडे नृत्य शिकावे लागले. या चित्रीकरणादरम्यान जॉनने मला खूप मदत केली.‘

टी-सीरिजने हा व्हिडीओ आपल्या यूट्युब चॅनलवर शेअर केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...