आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीचे बॉलिवूड कनेक्शन:दीपिकापासून असिनपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत होत्या कॅप्टन कूलच्या अफेअरच्या चर्चा, सर्वात खास मित्रांपैकी एक आहे जॉन अब्राहम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनीने आपले आवडते गायक मुकेश यांचे ‘मैं पल दो पल का शायर हूं…’ हे गाणे शेअर आपली निवृत्ती जाहीर केली.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीने शनिवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. धोनीने आपले आवडते गायक मुकेश यांचे ‘मैं पल दो पल का शायर हूं…’ हे गाणे शेअर आपली निवृत्ती जाहीर केली. या गाण्यासोबत धोनीने आपले क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण दाखवले. धोनीचे बॉलिवूडशी खूप जवळचे नाते आहे. साक्षीसोबत लग्नाआधी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, तर जॉन अब्राहम त्याच्या खास मित्रांपैकी एक आहे. 2007 आणि 2008 याकाळात धोनीचे नाव अभिनेत्री दीपिका पदुकोणशी जोडले गेले होते. त्यावेळी टी -20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर माही मोठा स्टार बनला होता, तर दीपिकानेही बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरुवातीच्या भेटीनंतर दोघांना बर्‍याच ठिकाणी एकत्र पाहिले गेले होते, धोनीच्या निमंत्रणानंतर, दीपिका धोनीला चीअर करण्यासाठी एक सामनादेखील पाहायला गेली होती. तर एका पत्रकार परिषदेत धोनीने दीपिकाला त्याचा क्रश असल्याचे सांगितले होते. दोघांनीही एकत्र रॅम्पवॉकही केला होता. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

  • रायलक्ष्मीशी जुळले होते नाव

यानंतर 2009 मध्ये धोनीचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री रायलक्ष्मीसोबत जुळले होते. हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. स्वत: रायलक्ष्मीने धोनीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. याविषयी धोनी मात्र कधीच बोलला नाही.

  • असिनसोबत होते नाते

यानंतर वर्षभराने धोनीचे नाव गजनी फेम असिनसोबत जुळले होते. त्यावेळी हे दोघेही एकाच क्लोदिंग ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करत होते. 2010 मध्ये आयपीएलच्या उपांत्य सामन्यापूर्वी धोनी असिनच्या लोखंडवाला येथील घरीही दिसला होता. त्यानंतर तेथे धोनीला पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

  • जॉन अब्राहमशी घनिष्ठ मैत्री

जॉन अब्राहम बॉलिवूडमधील माहीचा सर्वात चांगला मित्र आहे. धोनीने एकदा खुलासा केला होता की, जॉन अब्राहमची हेअरस्टाइल बघून त्याने स्वतःचे केस लांब ठेवले होते. त्यांच्या मैत्रीचे कारण म्हणजे दुचाकीविषयी दोघांमध्ये सारखीच क्रेझ आहे. याशिवाय धोनीप्रमाणे जॉनलाही फुटबॉलची आवड आहे. जॉन हा एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ज्याला धोनीने आपल्या लग्नात बोलावले होते. हे दोघेही बर्‍याच वेळा एकत्र बाईक चालवताना दिसले आहेत.

धोनीच्या निवृत्तीवर बॉलिवूड स्टार्सच्या प्रतिक्रिया

रणवीर सिंह

अभिषेक बच्चन

अनुपम खेर

कार्तिक आर्यन

रितेश देशमुख

वरुण धवन

अनुष्का शर्मा

सोनल चौहान

बातम्या आणखी आहेत...