आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'च्या रिलीजला 4 वर्षे:अक्षय कुमारला साकारायची होती धोनीची व्यक्तिरेखा, दिग्दर्शकाने त्याला नकार देऊन सुशांत सिंह राजपूतला केले होते साइन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • चित्रपटाचे बजेट 80 कोटी होती, त्यातील 40 कोटी धोनीला देण्यात आले होते.

30 सप्टेंबर रोजी 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 4 वर्षे पूर्ण होत आहेत. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या कारकीर्दीसाठी मैलाचा दगड ठरला. महेंद्र सिंग धोनीच्या व्यक्तिरेखेला पडद्यावर पूर्ण न्याय दिल्याबद्दल सुशांतचे खूप कौतुक झाले होते. तसेच धोनी आणि त्याच्या कुटुंबीयांनाही हा चित्रपट आवडला होता. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी चित्रपट वास्तवाच्या अगदी जवळ ठेवला होता याचा त्यांना आनंद होता. नीरजच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट 98% धोनीच्या वास्तविक जीवनावर आधारित होता.

सुशांत आता या जगात नाही परंतु या चित्रपटातील आपल्या दमदार कामाच्या माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहणार आहे. चला या चित्रपटाशी संबंधित काही खास फॅक्ट्स जाणून घेऊयात...

 • चित्रपटात जी शाळा दाखवण्यात आली आहे, त्याच शाळेत धोनीने शालेय शिक्षण घेतले होते. विशेष परवानगीने धोनीच्या मूळ शाळेतच चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते.
 • बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला धोनीची भूमिका साकारायची होती, पण दिग्दर्शक नीरज पांडेंना धोनी आणि त्याच्या लुकमध्ये बरीच असमानता जाणवली. त्यामुळे त्यांनी अक्षयला चित्रपटात कास्ट केले नाही. नंतर दिग्दर्शक-निर्मात्यांना सुशांत या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट वाटला आणि त्यांनी सुशांतला साइन केले. हे पात्र सुशांतच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरले आणि हा चित्रपट हिट ठरला.

 • एखाद्या क्रिकेटरच्या जीवनावर बनलेला हा पहिला चित्रपट होता, त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याआधीच रिलीज झाला होता.
 • अनुपम खेर यांनी चित्रपटासाठी आपल्या मिशा कापल्या होत्या. जेणे करुन ते धोनीच्या वडिलांसारखे दिसू शकतील.

 • चित्रपटाचे तामिळ, तेलुगू आणि मराठी भाषेत डबिंग झाले आहे.
 • क्रिकेटर किरण मोरे यांनी सुशांतला चित्रपट सुरु होण्याआधी 13 महिने प्रशिक्षण दिले होते. विकेट किपिंग बरोबरच बॅटिंगही शिकवले होते.
 • हेलिकॉप्टर शॉटच्या सरावासाठी सुशांत 200 ते 300 वेळेस तो शॉट दिला होता.
 • चित्रपटाचे प्रदर्शन जगभरात 61 देशात 45 पडद्यावर झाले होते. उरी हल्ल्यामुळे चित्रपट पाकिस्तानात रिलीज झाला नव्हता.
 • या चित्रपटाद्वारे भूमिका चावलाने बॉलिवूडमध्ये नऊ वर्षांनी कमबॅक केले होते. यापूर्वी ती 2007 मध्ये गांधी माय फादरमध्ये झळकली होती.
 • या चित्रपटात कियारा अडवाणीने धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारली होती. साक्षीने तिच्या लग्नाचा लहेंगा कियाराला चित्रपटातील लग्नाच्या दृश्यासाठी दिला होता.
 • या चित्रपटाद्वारे दिशा पाटनीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिने धोनीची प्रेयसी प्रियांकाची भूमिका साकारली होती. ख-या आयुष्यात एका अपघातात प्रियांकाचे निधन झाले होते. दिशाला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा स्क्रीन आणि स्टारडस्ट पुरस्कार देखील मिळाला होता.
 • 2016 मध्ये सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर होता. या चित्रपटाने जवळजवळ 133 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट 80 कोटी होती, त्यातील 40 कोटी धोनीला देण्यात आले होते.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser