आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चार वर्षांपूर्वी 30 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला "एमएस धोनी' चित्रपट दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा सर्वात यशस्वी चित्रपट मानला जातो. चित्रपटाला चार वर्षे झाल्यानमित्त ‘दिव्य मराठी’ने या चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधला...
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रिकेटर धोनीचे कोचही सेटवर हजर असत. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी त्यांची भेट घालून दिली होती. मात्र ते कोच आहेत, असे वाटत नव्हते. कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळेच होते. तरीदेखील मी दिग्दर्शकावर विश्वास ठेवला आणि नंतर न घाबरता धोनीच्या कोचची भूमिका साकारली.
दुसरे म्हणजे या चित्रपटात सुशांत सोबत माझी चांगली गट्टी झाली होती. त्याचे कारण जुने होते. कारण आम्ही यापूर्वी ‘शुद्ध देसी रोमांस’मध्ये काम केले होते. तेथे शूटिंग दरम्यान घाबरत घाबरत सुशांतने सिगारेट मागितली होती. त्यानंतर आमची भेट धोनीच्या सेटवर झाली होती. मी सेटवर लवकर पोहोचलो होतो. सुशांत नंतर गाडीतून उतरला. त्याच्या हातात सिगारेट होती. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर माझ्याकडे तुमची एक सिगारेट उधार आहे. त्यानंतर मी त्यांची तर ते माझी सिगारेट पित होते.
रांचीत एक मोठे हॉटेल होते. तेथे कबाब चांगले मिळायचे. तेथे सुशांत मला कबाब खायला घेऊन गेला होता. अनुपम खेरजीदेखील त्या जागेवर आम्हाला घेऊन जात होते. खरं तर, सुशांत खाऊ-पिऊ घालण्यात मागे पुढे पाहत नव्हता. तो सिंगल टेकमध्ये सीन ओके करत नव्हता. बऱ्याचदा दिग्दर्शकाने ओके म्हटल्यानंतरही तो म्हणायचा पुन्हा एकदा करू.
शूटिंगच्या ब्रेकदरम्यान चित्रपटापेक्षा संगीतावर जास्त चर्चा व्हायची. त्याला संगीताची आवड होती. त्याला पाहुन तो नैराश्यात असायचा असे वाटले नाही. लोक एखाद्या वैयक्तिक सवयींना त्याच्या व्यवसायाशी का जोडतात, हे मला कळत नाही. असो, या चित्रपटावर आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली होती. सुशांतचे समर्पण उदाहरण देण्यासारखे आहे. धोनीचे चालणे, बाेलणे, त्यांच्या सवयी सर्व काही आत्मसात केले हाेते. ती सर्वात मोठी गोष्ट होती.
धोनी चित्रपटानंतर सुशांत आणि मी एकमेकांना भइबा म्हणून हाका मारत होतो, पाटण्याहून येताना मी त्याच्यासाठी ठेकुआ आणि सिंघाडा घेऊन यायचो. हे दोन्ही खायला त्याला आवडायचे.
चित्रपट आणि सुशांतच्या किस्से बरेच आहेत. चित्रपटाच्या एका दृश्यात धोनी बनलेल्या सुशांतला आम्ही लोक कोलकाता विमानतळावर सोडायला जातो. रांचीच्या पुढे एक लोकेशन होते, तेथे हृदयाच्या आकाराच्या जागेवर आम्ही थांबलो. तेथे संघर्षापासून ते अध्यात्मापर्यंत आमच्या चर्चा रंगायच्या.
मुंबईत एक दृश्य शूट करत असताना सुशांतने आपल्या स्वप्नाविषयी सांगितले होते. त्यावेळी तो ‘चंदामामा’ करणार होता. तो खूपच चांगला माणूस होता. चित्रपटातील हेलिकॉप्टर शॉटवर त्याने बराच सराव केला होता. खरं तर, त्याने मला त्या शॉटच्या बारीकसारीक गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्या घरी जाणे-येणे सुरू असायचे. रिलीजनंतर मी बिहारला घरी गेलो होतो. तेथुन परतलो तेव्हा ठेकुआ, सिंघाडा घेऊन आलो होतो. आम्ही तीन चार तास सोबत होतो. पाटण्यावर बोलत बसलो हाेतो. मात्र 2016 नंतर त्यांच्याशी भेट झाली नाही. मॅसेजवर बोलत होतो. मात्र शूटिंगच्या वेळी तो कधीच नैराश्यात दिसला नाही. मीदेखील काही म्हटले तर योग्य ठरणार नाही. से
टवर सुशांत नेहमी हसतमुखाने बोलायचा. माझी वेब सिरीज ‘रक्तांचल’च्यावेळी मी त्यांना मॅसेज केला होता. मात्र त्यांचा नंबर बदलल्याने मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही.
एका मुलाखतीत सांगितले हाेते, सुशांत धाेनीची व्यक्तिरेखा जशीच्या तशी पडद्यावर साकारेल की नाही याविषयी मी नेहमी चिंता करायचो. त्याने हेलिकॉप्टर शॉटचा सराव केला होता. एकदा हातात वेदना होत असताना तो आराम करेल, असे वाटले. मात्र त्याने सराव सुरू केला. आपल्यामुळे चित्रपटाला उशीर होऊ नये असे त्याला वाटायचे. सुशांत धोनीप्रमाणे जमिनीवर झोपत होता. अरुण पांडेने एका मुलाखतीत सांगितले होते, छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये फरक येऊ नये म्हणून तो माहीला अनेक प्रश्न विचारायचा. एकदा मी, माही आणि सुशांत दिल्लीतील धोनीच्या एअर इंडियाच्या घरी गेलो होतो. माही घरात कसा बसायचा, कसा जेवण करायचा, सुशांत सर्व निरीक्षण करुन तसेच करण्याचा प्रयत्न करायचा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.