आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुकतीच ऑस्कर विजेता माहितीपट 'द एलिफंट व्हिस्पर्स'च्या टीमची भेट घेतली. यावेळी त्याने दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस आणि या माहितीपटामधील बोमन व बेलीचा सत्कार केला. धोनीने त्यांना CSK ची जर्सी भेट दिली. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
टीम चेन्नई सुपर किंग्सच्या इन्स्टाग्राम अकाउंवर एम.एस. धोनी आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' माहितीपटाच्या टीमचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये धोनी हा 'द एलिफंट व्हिस्पर्स' च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत. 'स्पेशल ओकेजन विथ स्पेशल पिपल' असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.
भेट दिली CSK क्रमांक 7 ची जर्सी
व्हिडिओमध्ये धोनीसह त्याची लेक जीवा ही देखील कार्तिकी गोंजाल्विस, बोमन आणि बेली यांची भेट घेताना दिसतेय. यावेळी धोनीने त्यांना CSK ची क्रमांक 7 असलेली जर्सी भेट म्हणून दिली.
'द एलिफंट व्हिस्परर्स'ला मिळाला ऑस्कर पुरस्कार
'द एलिफंट व्हिस्पर्स' या माहितीपटाला 95 व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिकी गोंजाल्विसने केले. तर याची निर्मिती गुनीत मोंगा यांची आहे. 39 मिनिटांच्या या लघुपटात मानव आणि प्राणी यांच्यातील नाते दाखवण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा दक्षिण भारतीय जोडपे बोमन आणि बेली यांची आहे, जे रघू नावाच्या अनाथ हत्तीची काळजी घेतात. हा माहितीपट मुळात तमिळमध्ये बनवण्यात आला होता. 8 डिसेंबर 2022 रोजी Netflix वर तो स्ट्रिम करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.